अक्कलकोट काशीराया काका पाटील शाळेच्या माजी विदयार्थ्यांचे अमूल्य योगदान ; दुष्काळी स्थितीत भरले दहावीच्या सर्व 45 विद्यार्थ्यांचे 24750 रुपये परीक्षा फी
सामाजिक बांधिलकी

काशीराया काका पाटील शाळेच्या माजी विदयार्थ्यांचे अमूल्य योगदान ; दुष्काळी स्थितीत भरले दहावीच्या सर्व 45 विद्यार्थ्यांचे 24750 रुपये परीक्षा फी

स्वतःच्या शिक्षणाच्या काळात आपल्या कुटुंबाच्या अडचणीच्या काळाने आपली परीक्षा फी व इतर खर्च भागविण्यात अनंत अडचणी येत होत्या. त्यातून मार्ग काढत काशीराया काका पाटील विद्यालय अक्कलकोटच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण करीत स्वतःच्या हिमतीवर काहींनी नोकऱ्या मिळविल्या तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केले. त्यातुन स्वतःला आणि कुटुंबाला देखील सावरले. ते तिथेच थांबता आपल्या समाजातील व प्रशालेतील विदयार्थ्यांना यावर्षीच्या पाऊस नसलेल्या दुष्काळी स्थितीत फी भरण्याचा त्रास होऊ नये यासाठी आपले गणित शिक्षक समीर मनियार सर यांनी केलेले आवाहन सहज पेलेले आणि काही तासातच शाळेतील सर्व 45 दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 550 रुपये प्रमाणे 24750 रुपयाची मदत गोळा झाली.सध्या अक्कलकोट तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने अक्कलकोट येथील काशिरायाकाका पाटील विद्यालयाचे सहशिक्षक समीर मनियार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी या हेतूने माजी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका विद्यार्थ्याची मार्च 2024 मध्ये होणाऱ्या एसएससी बोर्डाची परीक्षा फी 550 रुपये भरण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत काही तासातच प्रशालेतील सर्व 45 विद्यार्थ्यांची फी जमा झाली. मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सर्व शिक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत.सध्या पुण्यामध्ये कार्यरत चार्टर्ड अकाउंटंट बाबुराव व्हनकोळ यांनी 11000 रुपये देऊन सिंहाचा वाटा उचलला.
सध्या केनिया देशात कार्यरत असलेले रशीद जमादार यांनी 2600 रुपये,
नाशिक येथे कार्यरत असलेल्या मनीषा कुलकर्णी यांनी 1100 रुपये,
पद्मनाभ कुलकर्णी, अनिरुद्ध पाटील, प्रतिभा वाडे, सैपन मुल्ला, चंद्रकांत खेत्री, लक्ष्मण कुंभार, सोहेल शेख, राजशेखर माशाळे, दत्ता मातोळे, रूकमाजी वाघमारे, महेशकुमार कळवंत, मल्लिनाथ भंगुर्गीकर, सिद्धेश्वर हरवाळकर यांनी प्रत्येकी 550 रुपये दिले.
अक्कलकोट येथील डॉक्टर शहा फाउंडेशनचे चेअरमन विपुल शहा यांनी सुद्धा 1100 रुपये देऊन माजी विद्यार्थ्यांच्या कार्यास हातभार लावला.माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशालेच्या वतीने इन्चार्ज सौ अश्विनी पाटील व सर्व स्टाफ यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

राजशेखर चौधरी सर
मुख्याध्यापक,श्री काशिविश्वेश्वर हायस्कूल जेऊर,ता. अक्कलकोट
9881152428
(फोटो : विपुल शहा व बाबुराव व्हनकोळ यांचा आहे )
