स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग – शिक्षणमंत्री केसरकर ,आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान
स्वामी दर्शनाअंती दीपक केसरकर यांचे भावोद्गार

स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग – शिक्षणमंत्री केसरकर ,आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान

स्वामी दर्शनाअंती दीपक केसरकर यांचे भावोद्गार

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२१/१०/२३) – आपणास देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणे यातच जीवनाची धन्यता आहे. त्याकरिता भाविकांनी स्वामीभक्तीत गुंतून स्वामींचे नामस्मरण, मनन, चिंतन करीत राहणे यातच जीवनाचे सौख्य सामावले आहे. स्वामी भक्तीने जीवनाचा अर्थ समजून जीवन सोपे होते, कारण स्वामीभक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग असल्याचे व आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान असल्याचे मनोगत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने
त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, सचिन हन्नूरे, भिमा मिनगले, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, इत्यादी उपस्थित होते.
