श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सुनियोजित पद्धतीने स्वामी कार्य चालू असून, येथील व्यवस्था, भाविकांची सोय थक्क करून टाकणारी : प्रा.डॉ. मेघा कुलकर्णी

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुनियोजित पद्धतीने स्वामी कार्य चालू असून, येथील व्यवस्था, भाविकांची सोय थक्क करून टाकणारी असल्याचे मनोगत कोथरूड पुणे चे माजी आमदार व भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. मेघा कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

त्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू गुरुजी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी , मराठी अभिनेत्री गायत्री जाधव पुणे यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले.

यावेळी न्यासाचे सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, एस.के. स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिकार्जुन बिराजदार, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, प्रसन्ना बिराजदार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, देवराज हंजगे, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.