गावगाथा

पुजारी-कुलकर्णी परिवारचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न

विवाह सोहळा

पुजारी-कुलकर्णी परिवारचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न

(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.०८/०६/२०२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुरोहित तथा श्री स्वामी समर्थांचे पट शिष्य चोळाप्पा महाराजांचे वंशज पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या तृतीय कन्या व पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या भगिनी चि.सौ.का.डॉ.मृणाली व दौंड येथील श्री अनंतराव कुलकर्णी यांचे जेष्ठ सुपूत्र ॲड.प्रणव यांचा शाही विवाह सोहळा श्री स्वामी समर्थांच्या असीम कृपेने त्यांच्या दिव्य सान्निध्यात देवस्थानच्या भक्त निवास येथील स्वामींच्या मुर्तीसमोरील प्रांगणात आज रविवार दि. ८ जून रोजी सनई चौघड्यांच्या सुरात, श्री स्वामी समर्थांच्या भावभक्ती गीतांच्या श्रवणीय अविष्कारात तथा पवित्र मंगल अष्टकांनी अत्यंत
मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या शुभ विवाह सोहळ्यास तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे, श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले (महाराज) सहपरिवार, फुगेवाडी पुणे येथील जन्मेंजयराजे भोसले महाराज यांचे जावई संदीप दाजी फुगे,
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे, विश्वस्त अभय खोबरे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, दयानंद हिरेमठ, विजय दास, उज्वला सरदेशमुख, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, जेष्ठ नेते अशपाक बळोरगी, जि.प.माजी सभापती मल्लीनाथ पाटील, आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, मा.नगरसेवक महेश हिंडोळे, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय देशमुख, मा.उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, मुंबईचे स्वामी भक्त ॲड.मधुकर वैद्य, उद्योगपती साईप्रसाद सामंत, राजू गव्हाणकर, कोल्हापूरचे स्वामी भक्त जनार्दन कोरे, ॲड.विजय हर्डीकर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न हत्ते, उद्योगपती विलास कोरे, राजेश निलवाणी, विश्राम पटेल, डॉ.मनोहर मोरे, डॉ.आदीत्य कोतवाल, डॉ.हिरण्णा पाटील, डॉ.विपूल शहा, डॉ.संतोष मेहता, डॉ.आर.व्ही.पाटील, व्यापारी असोसिएशन, मेडीकल असोसिएशन, डॉ.असोशिएशनचे सर्व पदाधिकारी, संतोष पराणे आदींसह पुजारी – कुलकर्णी परिवारांचे आप्तेष्ट नातलग व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सर्व कर्मचारी – सेवेकरी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कर्मचारी सेवेकरी, राजेराय मठ व समाधी मठाचे कर्मचारी सेवेकऱ्यांसह अनेक आमंञीत नागरीकांनी या शाही शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू- वरांस शुभ आशिर्वाद दिले. या प्रसंगी सर्व आमंञीतांना शाही भोजनाची व्यवस्था पुजारी परिवाराच्या वतीने करण्यात आली होती. या शाही विवाह सोहळ्यास भव्य वाटरप्रुफ शामीयाना उभारण्यात आला होता. या शुभविवाहास येणाऱ्या प्रमुख मान्यवरांचे वाजंत्रीच्या सुमधूर निनादात भव्य स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button