*पुणे येथील स्वामी भक्त रामकृष्ण वसंतराव फुले व दिलीप साहेबराव सातकर यांनी अन्नछत्र मंडळास रुपये ८ लाख ३६ हजार किंमतीचे ताशी १ हजार चपाती उपलब्ध करून देणारे चपाती मेकर यंत्र रविवारी भक्तार्पण करण्यात आले.*
अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांना सुलभ सोयी-सुविधा उपलब्द करून देण्याकरिता नेहमीच आग्रही भूमिका असते, स्वामी भक्तांच्या सेवेची ३६ वर्षाची वाटचाल सुरु
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231029-WA0074-780x470.jpg)
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांना सुलभ सोयी-सुविधा उपलब्द करून देण्याकरिता नेहमीच आग्रही भूमिका असते, स्वामी भक्तांच्या सेवेची ३६ वर्षाची वाटचाल सुरु असून, पुणे येथील स्वामी भक्त रामकृष्ण वसंतराव फुले व दिलीप साहेबराव सातकर यांनी अन्नछत्र मंडळास रुपये ८ लाख ३६ हजार किंमतीचे ताशी १ हजार चपाती उपलब्ध करून देणारे चपाती मेकर यंत्र रविवारी भक्तार्पण करण्यात आले.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
दरम्यान या यंत्राचे पूजन न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या उपस्थितीत स्वामी भक्त रामकृष्ण वसंतराव फुले व दिलीप साहेबराव सातकर व भक्त, सेवेकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामकृष्ण वसंतराव फुले व दिलीप साहेबराव सातकर यांचा श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
याप्रसंगी फुले व सातकर यांच्या समवेत सुनील पवार, नारायणराव लोणकर, नंदाताई फुले, जोशना फुले, पूजा बेडगे, रेखा झगडे, दीप्ती कराळे हे उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, अँड.संतोष खोबरे, संतोष भोसले, पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडग, देवराज हंजगे, श्रीशैल कुंभार, नामा भोसले, लाला निंबाळकर, मेजर संतोष रावले, राहुल इंडे, शिवू स्वामी, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगणुर, अक्षय यळवंडे, सागर याळवार, महेश आहेरकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)