महाप्रसादालयाचे उत्तम व्यवस्थापन असून, परिसरातील भक्तिमय वातावरणामुळे मन प्रसन्न व महाप्रसादामुळे तृप्त होत असल्याचे: प्रसिध्द अभिनेता सुदेश बेरी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसादालयाचे उत्तम व्यवस्थापन असून, परिसरातील भक्तिमय वातावरणामुळे मन प्रसन्न व महाप्रसादामुळे तृप्त होत असल्याचे मनोगत प्रसिध्द अभिनेता सुदेश बेरी यांनी व्यक्त केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत शुभम चापेकर हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, अँड.संतोष खोबरे, संतोष भोसले, पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, निखिल पाटील, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, देवराज हंजगे, श्रीशैल कुंभार, नामा भोसले, मेजर संतोष रावले, राहुल इंडे, शिवू स्वामी, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगणुर, अक्षय यळवंडे, सागर याळवार, महेश आहेरकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
