तालुक्यातील तंत्रशिक्षणात कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे योगदान महत्त्वाचे
स्वामी दर्शनानंतर तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर यांचे मनोगत.

तालुक्यातील तंत्रशिक्षणात कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे योगदान महत्त्वाचे
स्वामी दर्शनानंतर तंत्रशिक्षण संचालक
डॉ.विनोद मोहितकर यांचे मनोगत.
(अक्कलकोट, श्रीशैल गवंडी)
अक्कलकोट सारख्या राज्याच्या सीमावर्ती भागात अक्कलकोट तालुक्यातील व परिसरातील एकमेव तंत्रनिकेतन महाविद्यालयाची निर्मिती करून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समिती व देवस्थानचे तत्कालीन माजी चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांनी तालुक्यातील तंत्र शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गरज भागवली आहे. राज्याच्या सीमावरती भागातील व अक्कलकोट तालुक्यातील या एकमेव तंत्रनिकेतन महाविद्यालयामुळे व या महाविद्यालयातील उच्च विद्याविभूषित प्राचार्य व शिक्षक वृंदांमुळे तालुक्यात तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावलेला आहे. याचे श्रेय देवस्थानचे व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे माजी चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांना जाते. आज या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी तंत्रशिक्षणात आपले करियर घडवून विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत, म्हणून कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे तंत्रशिक्षणातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयास व श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.विनोद मोहितकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी डॉ.मोहितकर बोलत होते. पुढे बोलताना मोहितकर यांनी स्वामी समर्थांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा या महाविद्यालयाच्या व मंदिर विश्वस्त समितीच्या व समिती प्रमुख महेश इंगळे यांच्या पाठीशी सदैव आहेत. त्यामुळे वटवृक्ष देवस्थानचे तंत्र शिक्षण क्षेत्रातील व देवस्थानच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रातील कार्य यापुढेही अव्याहतपणे चालू राहतील अशा प्रकारचे मनोदय व्यक्त केले. याप्रसंगी कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, उपप्राचार्य विजयकुमार पवार, समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, बंटी नारायणकर, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.विनोद मोहितकर व कुटुंबीयांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, नागनाथ जेऊरे व अन्य दिसत आहेत.
