महेश इंगळेंचे व्यक्तीमत्व आमचे प्रेरणास्थान – उमेश पाटील
वटवृक्ष मंदिरात सरपंच उमेश पाटील रोहिणी पाटील यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

महेश इंगळेंचे व्यक्तीमत्व आमचे प्रेरणास्थान – उमेश पाटील

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२०/१०/२३) – सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांसह सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वांना नेहमी सहकार्य करणारे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे व्यक्तीमत्व म्हणजे सकारात्मक जीवनशैलीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यामुळे महेश इंगळे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रेरणास्थान असल्याचे मनोगत तालुक्यातील चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी व्यक्त केले. सरपंच उमेश पाटील यांनी नुकतेच सपत्नीक श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी उमेश पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी रोहिणी पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करून उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी या सत्कार प्रित्यर्थ बोलताना सरपंच उमेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, महेश पाटील, मनोज इंगुले, ख्वाजपा झंपले, अविनाश कदम, प्रकाश सुरवसे, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, शिवशरण पाटील, इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात सरपंच उमेश पाटील रोहिणी पाटील यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
