गावगाथा

अक्कलकोटमध्ये ज्युनिअर सीनियर सॉफ्टबॉल थ्रो बॉल राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन – महेश इंगळे

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर शहर जिल्हा सॉफ्टबॉल थ्रोबॉल असोसिएशनचा संयुक्त उपक्रम

अक्कलकोटमध्ये ज्युनिअर सीनियर सॉफ्टबॉल थ्रो बॉल राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन – महेश इंगळे

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर शहर जिल्हा सॉफ्टबॉल थ्रोबॉल असोसिएशनचा संयुक्त उपक्रम

मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३/१२/२०२३) श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर शहर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुला मुलींची
२९ वी जूनियर व ३३ वी सीनियर थ्रो बॉल अजिंक्यपद स्पर्धा तसेच चौथी सब ज्युनिअर व सीनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा दिनांक ४/१२/२०२३ ते ६/१२/२०२३ अखेर येेथील राजे फत्तेसिंह मैदानावर आयोजीत करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी गृहराज्यमंत्री माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, नगरसेवक विनोद भोसले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले, सिद्धेश्वर पाटील, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे भुषवतील. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दिनांक ६/१२/२३ रोजी दुपारी ४ वाजता सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या शुभहस्ते, सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सॉफ्टबॉल फेडरेशनचे अध्यक्ष विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुले व मुली असे एकूण ४९ संघातून एकूण ६३० खेळाडू ,पंच, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धा साखळी व बाद पद्धतीचे होणार आहेत. देवस्थानच्या वतीने खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे. या समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून याप्रसंगी महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील धाबर्डे, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र माने, सचिव सुनील इंगोले, सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, डीवायएसपी विलास यामावार, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, तहसीलदार बालाजी बनसोडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक महेश स्वामी, मुख्याधिकारी सचिन पाटील, सॉफ्टबॉल असोसिएशन जिल्हा अध्यक्ष अभिनंदन राठोड, उपाध्यक्ष वैजनाथ हत्तुरे, जिल्हाधिकारी कार्यालयीन अधिकारी प्रवीण घम, जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण, कारगिल पेट्रोल पंपाचे मालक सचिन किरनळ्ळी, डॉ.नंदा शिवगुंडे तसेच सोलापूर सॉफ्टबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील.
या स्पर्धेचे आयोजन व नियोजनकामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.संतोष खेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव प्रशांत कदम, खजिनदार शिवाजी वसपटे, संचालक मारुती घोडके, सचिन कुमार गाडेकर, राजाराम शितोळे, दत्तात्रय पाटील, नागप्‍पा मैंदर्गी, प्रमोद चुंगे, उमेश नेवाळे, मदनकुमार पोलके, प्रशांत बिराजदार, आनंद लिगाडे, श्रीधर गायकवाड, गंगाराम घोडके, दिलीप कुमार बंदीछोडे, धर्मराज कट्टीमनी, रवींद्र डोंबाळे, प्रबुद्ध चिंचोलीकर, प्रशांत कदम, विष्णू दगडे, प्रशांत राणे, अमोल कोकाटे, प्रा.दत्तात्रय बिराजदार, सतीशकुमार परदेशी, श्रीधर गायकवाड, प्रकाश सोनटक्के, गंगाराम घोडके, प्रबुद्ध चिंचोलीकर, उमेश नेवाळे, दयानंद दणूरे, परमेश्वर व्हसुरे, अविनाश राठोड, सिद्धेश्वर पुगरे आदी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button