गावगाथा

नागणसूर मराठी शाळेत मातृपुजनाने गुरुपौर्णिमा साजरी

शिक्षणाबरोबर संस्कार देणारी पाठशाला : डॉ श्री. अभिनव बसवलिंग महास्वामीजी*

*नागणसूर मराठी शाळेत मातृपुजनाने गुरुपौर्णिमा साजरी

*शिक्षणाबरोबर संस्कार देणारी पाठशाला : डॉ श्री. अभिनव बसवलिंग महास्वामीजी*

नागणसूर : नागणसूर येथील जिल्हा परिषद प्राथ. मराठी शाळेत गुरुपौर्णिमा मठाचे मठाधीपती डॉ श्री. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर इयत्ता पहिली विद्यार्थ्यांच्या माता व मुख्याध्यापिका सौ सुनीता राजमाने मॅडम होत्या.
सर्वप्रथम श्री बसवलिंगेश्वर महास्वामीजी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर परमपूज्य डॉ श्री अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांची पादपूजा सौ. लक्ष्मी कोटे मॅडम व सौ सुनीता राजमाने मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आली आप्पाजींचे स्वागत अध्यक्ष श्री विश्वनाथ प्रचंडे व सदस्य श्री हणमंत मणुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिली मुलाच्या हस्ते मातृपूजन आप्पाजीच्या मंत्रवाणीने करण्यात आले.तदनंतर आप्पाजीच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या आशीर्वाचनातून डॉ श्री अभिनव बसवलिंग महास्वामीजी बोलताना गुरुपौर्णिमेनिमित्त मातृ पूजन व गुरुपाद पूजा घेऊन शिक्षणाबरोबर संस्काराची पिढी घडवण्याची काम नागणसूर मराठी शाळेतील शिक्षक करीत आहेत असे शाळेचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ राजमाने मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सौ निर्मला मलगणकर , सौ संतोषी कट्टीमनी ,सौ सुरेखा हसरमनी ,सौ लक्ष्मी कोटे, सौ राजश्री कल्याण श्री सिद्धाराम तळवार ,श्री. विश्वनाथ देवरमनी, श्री. राजशेखर गोब्बूर श्री बसवराज खिलारी, श्री सुरेश यलगुंडे ,श्री मंजुनाथ मणुरे श्री परशुराम चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बसवराज खिलारी सर यांनी केले आभार सिद्धाराम तळवार सर यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button