गावगाथा

स्वामी भक्तीच माझ्या मानवी जन्माचे धर्म – न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे : आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य महान

न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे व त्यांच्या धर्मपत्नींचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, न्यायाधीश शेख व अन्य दिसत आहेत.

स्वामी भक्तीच माझ्या मानवी जन्माचे धर्म –
न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे : आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य महान

HTML img Tag Simply Easy Learning    

आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य महान

HTML img Tag Simply Easy Learning    

स्वामी दर्शनाअंती न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांचे भावोद्गार

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.०९/३/२४) – आपणास देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणे यातच जीवनाची धन्यता आहे. त्याकरिता भाविकांनी स्वामीभक्तीत गुंतून स्वामींचे नामस्मरण, मनन, चिंतन करीत राहणे यातच जीवनाचे सौख्य सामावले आहे. स्वामी भक्तीने जीवनाचा अर्थ समजून जीवन सोपे होते. ही प्रचिती मला आली आहे, म्हणून स्वामीभक्ती हीच माझ्या मानवी जीवनाचे धर्म असल्याचे
मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे
यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी बोलताना न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे
यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान असल्याचे मनोगतही न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी व्यक्त केले. यावेळी अक्कलकोट न्यायालयाचे न्यायाधीश शेख साहेब, स्वप्निल मोरे, मंदिर समितीचे श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, सचिन हन्नूरे, भिमा मिनगले, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे व त्यांच्या धर्मपत्नींचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, न्यायाधीश शेख व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button