अभिनेते हार्दीक जोशी समर्थांच्या चरणी नतमस्तक ; मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी केला हार्दिक जोशी यांचा सन्मान
१४७ व्या स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचेही दिले निमंत्रण.

अभिनेते हार्दीक जोशी समर्थांच्या चरणी नतमस्तक ; मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी केला हार्दिक जोशी यांचा सन्मान

१४७ व्या स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचेही दिले निमंत्रण.

(अकोट,दि.१३/०४/२०२५) महाराष्ट्राच्या रसिकांवर भुरळ घातलेल्या व सध्या प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेल्या छोटया पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेतील राणा या भूमिकेतील हार्दिक जोशी यांनी
नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व मा.नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
१४७ व्या स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचेही निमंत्रण दिले. याप्रसंगी बोलताना जोशी यांनी तुझ्यात जीव रंगला ही मालिका टीव्हीवर सुरुवात होण्यापूर्वी आम्ही सर्व कलाकार या मालिकेच्या यशाकरिता अक्कलकोट स्वामींच्या चरणी साकडे घातले होते. आज स्वामी समर्थांची कृपादृष्टी व आशीर्वादाने आमची ही मालिका लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असून असेच यश यापुढेही मिळावे व या सत्काराच्या माध्यमातून मिळालेले स्वामींचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावे याकरिता स्वामींच्या चरणी प्रार्थना केले असून श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी
महोत्सवानिमित्त पुन्हा स्वामींच्या दर्शनाकरिता येण्याचे मानस व्यक्त केले.
या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, नरसिंग क्षीरसागर, बाळासाहेब एकबोटे, ऋषिकेश लोणारी, अविनाश क्षीरसागर, अनंत क्षीरसागर, महेश काटकर, मोहन जाधव, सागर गोंडाळ, संतोष पराणे, श्रीकांत मलवे व नागरिक आणि स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – हार्दिक जोशी यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
