सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संशोधन कार्यशाळेत डॉ.अमोगसिद्ध चेंडके यांचे व्याख्यान संपन्न
ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय, सोलापूर येथील मराठी विभागातील डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांचे 'संशोधनातील तांत्रिकता' या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संशोधन कार्यशाळेत डॉ.अमोगसिद्ध चेंडके यांचे व्याख्यान संपन्न


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संशोधन कार्यशाळा २०२३ मध्ये ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय, सोलापूर येथील मराठी विभागातील डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांचे ‘संशोधनातील तांत्रिकता’ या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले.

प्रबंध लेखनाचे तंत्र आणि संशोधनातील नैतिकता या विषयावर त्यांनी उपस्थित संशोधक विद्यार्थ्यांना संबोधित केले. प्रबंधाचे लेखन कशे करावे, संशोधनातील नैतिकता कशी पाळावी यावर त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. यादरम्यान मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, प्रा. रामदास वाघमारे, प्रा. बाबासाहेब सोनकांबळे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पाटील यांनी केले.
