PCMC : क्रिकेट खेळताना दारूंब्रे चे मिलिंद भोंडवे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
PCMC (प्रतिनिधी): सांगवीच्या पीडब्लयुडी मैदानात क्रिकेट खेळत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिलिंद भोंडवे (वय-40, रा. दारूब्रे) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पिंपरी-चिंचवड येथील सांगवीत पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचा आज तिसरा दिवस होता. काल (दि.24 मे) रोजी दुपारी मिलिंद यांच्या संघाचा सामना सुरु होता आणि त्या सामन्यामध्ये ते गोलंदाजी करत होते. गोलंदाजी करत असताना त्यांना अचानकपणे चक्कर आली आणि ते मैदानावर पडले. त्यांच्यासोबत खेळणाऱ्या इतर खेळाडूंनी धावत येऊन त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मिलिंद हे उत्तम क्रिकेटर होते. त्यांच्या जाण्याने भोंडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
