स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

पंढरीची वारी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – महेश इंगळे

अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या हस्ते आरती होवून अक्कलकोट ते पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

पंढरीची वारी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – महेश इंगळे

अभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या हस्ते आरती होवून अक्कलकोट ते पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

मानवी जीवनात कोणत्याही संपत्तीपेक्षा भावभक्तीची संपत्ती ही अमुल्य असून ईश्वर स्मरणात जीवन व्यतीत करणाऱ्या भाविकांना ही संपत्ती लाभत असते, त्यामुळे पंढरीस जाणारा वारकरी हा खऱ्या अर्थाने या भक्ती संपत्तीचा उपभोक्ता असून पंढरीच्या वारीतच जीवनाची सार्थकता असल्याने सर्व जाती धर्माचे लोक या वारीत गुण्यागोविंदाने एकत्र येतात त्यामुळे पंढरीची वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन श्री वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. ते नुकतेच वटवृक्ष मंदिरातल्या अक्कलकोट ते पंढरपूर दिंडी प्रस्थान प्रसंगी बोलत होते.
सालाबादप्रमाणे यंदाही तीर्थक्षेत्र अक्कलकोट ते तीर्थक्षेत्र पंढरपूर पायी माघवारी दिंडीचे प्रस्थान वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध
मराठी चित्रपट अभिनेत्री तृप्ती भोईर व पालघर येथील आदिवासी महिला विकास शेल्टर फाउंडेशनचे विश्वस्त शितल निकम यांच्या हस्ते दिंडी पूजनाने झाली.
गेल्या ३२ वर्षांपासून अक्कलकोट ते पंढरपूर पायी दिंडी वारी कै.बाळासाहेब इंगळे यांच्या प्रेरणेने चालू आहे. याचा वारसा वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मोठ्या उत्साहाने चालू ठेवला आहे असे मनोगत मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून बोस्टन अमेरिकेतील स्वामीभक्त प्रिया सावंत, दिंडी चालक व प्रमुख श्रीमुख जगदाळे, मंदार महाराज, दिंडी उपाध्यक्ष मदन होटकर, बाबू पांचाळ, धनू पाटील, अनंत पाटील, अप्पाराव पाटील, धोंडीराम पाटील, व्यंकट पाटील, राजू आवळे, भास्कर आबा, मधु महाराज, नंदकुमार जगदाळे, शिवाजी केदारे, पांडूरंग शिंदे, नरसिंग क्षीरसागर, हारीमुळे, सहू, मदनेबाई, अनुसया पाटील, चंद्रकला माळी, जयदेव सुर्यवंशी, धनराज पाटील, प्रशांत भगरे, शिवा यळवार, बोदले यलगेरी, मंगेश फुटाणे, प्रसाद सोनार, मोहन शिंदे, संजय पाठक, संतोष पराणे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रा.शिवशरण अचलेर, दिपक जरिपटके, गिरीश पवार, सागर गोंडाळ, संजय पवार, अविनाश क्षीरसागर, श्रीशैल गवंडी, महेश मस्कले, श्रीपाद सरदेशमुख आदिंसह हजारो भाविक उपस्थित होते.

फोटो ओळ – अक्कलकोट ते पंढरपूर माघवारी पायी दिंडीचे पूजन करून दिंडी प्रस्थान प्रसंगी अभिनेत्री तृप्ती भोईर, शीतल निकम, महेश इंगळे, व्यंकटेश महाराज पुजारी, व इतर भाविक भक्त दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button