सदानंद माळगे यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर
पुणे — शिक्षण व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदानंद माळगे यांना “जॉय सामाजिक संस्था” यांच्या वतीने “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शिक्षणातील योगदान, विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे आणि सामाजिक भान ठेवून कार्य केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात येत आहे.
सदानंद माळगे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्य करत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत नवे उपक्रम राबवले. नवोपक्रम, आधुनिक अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी शिकवणीपद्धत, तसेच सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग लक्षात घेता, जॉय संस्थेने त्यांची निवड केली आहे.
या पुरस्काराचे वितरण लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष समारंभात करण्यात येईल, अशी माहिती संस्थेच्या सचिवांनी दिली. या पुरस्कारामुळे शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्यात येते आणि इतर शिक्षकांसाठीही प्रेरणा ठरते, असेही ते म्हणाले.
सदानंद माळगे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य हे इतरांसाठी मार्गदर्शक ठरले आहे आणि हा पुरस्कार त्याच्या योगदानाची पावती आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!