श्रावण मांस विशेष

“सत्संग भगवंताच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग ” ———प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार

हुन्नुर येथील हभप व्हनमोरे यांनी रक्षाबंधनावर प्रभावीपणे कन्नड व मराठीतून कीर्तन सादर केले

“सत्संग भगवंताच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग “
———प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार
बाळगी (ता.द.सोलापूर)दि.30 भारतीय संस्कृतीने जीवन आनंदमय करण्याचे अनेक मार्ग सान्गितले आहेत. त्यात सत्संग हा एक उत्तम मार्ग आहे.दुस-याचे चान्गले गुण घेऊन आपण आपले जीवन घडवू शकतो .आदर्श निर्माण करून समाज बदलू शकतो.त्यासाठी आचरण महत्वपूर्ण आहे.असे विचार संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार यानी साधना कुटी आयोजित कार्यक्रमात मान्डले .कार्यक्रमाच्या प्रारंभी विजयपूर आश्रमाचे पूज्य सिध्देश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बिज्जरगी यांनी केले.व कार्यक्रम आयोजित करण्यामागील हेतू सान्गितला. यावेळी बाळगी परिसरातील भजनी मंडळानी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.
हुन्नुर येथील हभप व्हनमोरे यांनी रक्षाबंधनावर प्रभावीपणे कन्नड व मराठीतून कीर्तन सादर केले .रघुनाथ कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळगी येथील पाटील कुटुंबीयांकडून मान्यवरांना स्नेहभोजन देण्यात आले.
कार्यक्रमात विजयकुमार कस्तुरे,अमोगसिध्द कस्तुरे,बसवंत पाटील आनंदराव कोले,गणपत पोतदार,योगेश कस्तुरे व सरपंच,तंटामुक्त अध्यक्ष आणि मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button