
सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांचा सुवर्ण वाढदिवस वृद्धसोबत झाला साजरा

मुंबई प्रतिनिधी
पूनम पाटगावे

जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी नुकताच २७ जानेवारी रोजी त्यांचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस मीरारोड काशीगाव स्थित नित्यानंद आश्रमातील वयोवृध्द लोकांबरोबर साजरा केला.यावेळी या वृद्धबरोबर गणेश हिरवे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधून त्यांच्याशी गप्पागोष्टी करून त्यांची सुख दुःख जाणून घेतली.यावेळी त्यांना अन्नदान करण्यात आले.आठवण भेट म्हणून हिरवे यांनी उपस्थित मान्यवरांना बीइंग फिफ्टी इयर्स ऑफ अवेसम असे मेडल्स भेट दिले.आजच्या कार्यक्रमासाठी हिरवे यांच्या बरोबर त्यांची पत्नी योगिता, मुलगा प्रियांस त्यांच्या जॉय संस्थेचे कार्यकर्ते चंद्रशेखर सावंत, भूषण मुळये, असुंता डिसोजा, मीना भूतकर, दत्ता रातवडकर, हिरवे सरांची विजू मावशी आणि वासुदेव काकाआदी मान्यवर वेळातवेळ काढून उपस्थित होते.यावेळी गोपी पुरुषोत्तम आणि नवीन गाला यांचाही वाढदिवस असल्याने त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.नित्यानंद आश्रमचे संचालक प्राचार्य रुपेश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
