गावगाथाठळक बातम्या

Nagansur : प्रचंडे प्रशालेची कन्नड माध्यमची कुमारी धानम्मा पुजारी बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम 

नागणसूर (प्रतिनिधी) दि. 06, अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील श्री मल्लिनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एच. जी. प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचा फेब्रुवारी 2025 मध्ये पुणे बोर्डाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल 60.55% लागला असून कुमारी धानम्मा पुजारी हिने कन्नड माध्यमामध्ये 84.67% गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

कुमारी श्रीदेवी पुजारी हिने 77.67% गुण मिळवून प्रशालेत द्वितीय क्रमांक तर, कुमारी लक्ष्मी कानेकर हिने 76.50% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविले आहे. बारावी परीक्षेसाठी 76 विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यात चार विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळविलेआहे. आठ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 14 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर, वीस विद्यार्थी पास क्लास मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक प्राध्यापक ईरण्णा धानशेट्टी, अनिल इंगळे, शरणप्पा मणूरे, प्रशांत नागूरे, चिदानंद मठपती, बसवराज कोळी, सूर्यकांत कडबगावकर यांचे संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक, प्राचार्य शंकर व्हनमाने यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सरपंच सुनीता चव्हाण, उपसरपंच शांताबाई प्रचंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रसाद प्रचंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पालक आदीने गौरव करून सत्कार  सत्कार केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button