गावगाथाठळक बातम्या

PCMC : तो ‘SMS’ खोटा..! शहरातील सर्व फिल्टर मशीन चालू ; निर्जंतुकीकरण करूनच पाणीपुरवठा – पालिकेचे स्पष्टीकरण

HTML img Tag Simply Easy Learning    

निगडी (प्रतिनिधी – दयानंद गौडगांव): पिंपरी चिंचवड – शहरातील जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा व त्यामध्ये बिघाड झाल्याचे ‘एसएमएस’ सध्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून पाणी निर्जंतुकीकरण न करताच सोडण्यात येणार असल्याचेही त्याद्वारे सांगण्यात येत असल्याचे खोटे एसएमएस जाणीवपूर्वक पसरविण्यात येत असून अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरण करुन विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी टी.सी.एल पावडर वापरण्यात येते.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येत असून शहरामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा व त्यामध्ये बिघाड झाल्याचे ‘एसएमएस’ सध्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून पाणी निर्जंतुकीकरण न करताच सोडण्यात येणार असल्याचेही त्याद्वारे सांगण्यात येत असल्याचे खोटे एसएमएस जाणीवपूर्वक पसरविण्यात येत असून अशी कोणतीही परिस्थिती नाही. जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर हाऊस सुरु असून नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, असे जलशुध्दीकरण केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’ व माहितीवर विश्वास ठेवू नये …

“सध्या शहरामध्ये फिल्टर मशीन बंद असल्याचे व निर्जंतुकीकरण न करता पाणी सोडण्यात येणार असल्याचे ‘एसएमएस’ पाठविले जात असून यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही. सध्या पाठविल्या जाणाऱ्या खोट्या ‘एसएमएस’ पाठविणाऱ्याचा शोध घेवून संबंधितांवर सायबर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.” – प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button