
*कल्याणशेट्टी महाविद्यालयात बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न ..*

अक्कलकोट: सौ सुरेखा कल्याणशेट्टी महाविद्यालय अक्कलकोट येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी हे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, सीईओ रूपाली शहा, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख पूनम कोकळगी, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी हे उपस्थित होते. विद्यार्थांना मार्गदर्शन करताना संचालिका शांभवी कल्याणशेट्टी यांनी उपस्थित बारावीच्या कला,वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेऊन आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करावे असे सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पूनम कोकळगी, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी यानीही सर्व परीक्षार्थीना शुभेच्छा दिले. व शेवटी अध्यक्षीय भाषणातून मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थांना सदिच्छा रुपी शुभेछा दिल्या….
कार्यक्रमचे सूत्रसंचालन कुमारी भुरले तर आभार कुमारी इरावाडकर या विद्यार्थ्यांनी केले याप्रसंगी सर्व प्राध्यापक वृद उपस्थित होते.
