स्टेशन, कडबगाव भागात चोरट्यांचा हैदोस – शेतातील मोटार वायर चोरीला
स्टेशन व कडबगाव परिसरातील ७ ते ८ शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारींच्या वायर चोरट्यांनी काल रात्री चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात या चोरीमुळे आणखीनच भर पडली आहे.
शेतातील सिंचनासाठी अत्यावश्यक असलेल्या मोटारी बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, अजूनही काही शेतकऱ्यांनी शेतातील मोटारी तपासलेल्या नाहीत. त्यामुळे अशा आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या प्रकरणी स्थानिक शेतकरी शिवानिंगप्पा शटगार (मो. ९३७३८ ९९६३०) म्हणाले, “माझ्या दोन्ही शेतातील वायर चोरीला गेला आहे, असे जर वारंवार होत असेल तर शेतकरी जगायचं कसं?”
वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असतानाही अद्याप प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!