गावगाथाठळक बातम्या
Akkalkot ; स्वर्गीय शांताबाई नंदे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नंदे परिवाराकडून गरीबांना फळांचे वाटप

अक्कलकोट (प्रतिनिधी): साप्ताहिक गावगाथा चे संपादक तथा अक्कलकोट घडामोडीचे पदाधिकारी धोंडप्पा नंदे यांच्या मातोश्री स्वर्गीय शांताबाई मलकप्पा नंदे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त अक्कलकोट शहरातील बसस्थानक परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबाला फळांचे वाटप करण्यात आले.

अक्कलकोट मधील प्रसिद्ध असे राॅबीन हूड आर्मी यांच्या सहकार्याने नंदे कुटुंबीयांनी गरजू लोकांच्या घरापर्यंत जाऊन ही फळं वाटप केली.

यावेळी सहकार्य केलेले, राॅबीन हूड आर्मी चे सोहेल फरास, मुद्दसर खिस्तके, मुस्तफा बागवान आदींचे नंदे कुटुंबीयांनी आभार मानले.
