वटवृक्ष मंदीरात गंधार इव्हेंटस् प्रस्तुत
श्री स्वामीचरणी संगीत उत्सव संपन्न
अश्विन साखरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भक्ती संगीत उत्सव श्रवण सेवेचा भाविकांनी घेतला लाभ
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. )
आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मुंबई-भांडूप येथील अश्विन साखरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गंधार इव्हेंटस् प्रस्तुतीने संपन्न झालेल्या या भक्ती संगीत उत्सव गायन सेवेचा हजारो भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने लाभ घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सर्व मान्यवर कलाकारांचा चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न झालेल्या या भक्ती संगीत उत्सव सेवेत संकल्पक अश्विन साखरे यांच्या अधिपत्त्या खाली निर्माता गायक अश्विन साखरे, गायक विजय कर्जाळकर, मंगेश गांगुर्डे, गायिका प्रिती तोबणे, करिश्मा आठवले यांनी स्वामी समर्था माझे आई, मला दे गं आसरा, गवळण, स्वामी कृपा कधी करणार, दत्ता धावरे, आईचा गोंधळ, जा रे जा रे सारे स्वामी दर्शनाला, गुरुमाऊलीला भेटायला, बघ उघडून दार, ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले, अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांड्ररंग, माय भवानी जय बोला स्वामी समर्थ आदींसह एकाहून एक सरस भक्तीगीते सादर करून उपस्थित भाविकांना भक्तीरसाचा आनंद दिला. या गायन सेवेत गायक कलाकारांना कॅरेक्टरमध्ये अभिनेते रोहन पाटील, किबोर्डवर स्वप्निल निवळकर, शैलेश पाटोळे, ढोलकीवर नागेश कांबळे, ऑक्टोपॅडवर सुर्यकांत गायकवाड,
परक्युजनवर सचिन सारंग आदींनी उत्तम साथसंगत केली. या भक्ती संगीत सेवेत मुंबई येथील वैभव सातोस्कर, सोलापूर येथील प्रकाश कासेगांवकर यांनी दिलेल्या साऊंड सिस्टीम सेवेने आणखीन रंगत भरली. या प्रसंगी मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, धनराज स्वामी, प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, बाळासाहेब घाटगे, अंकूश केत, सुनिल पवार, विपूल जाधव, रविराव महिंद्रकर, स्वामीनाथ लोणारी, बंडोपंत घाटगे, मोहन शिंदे, मनोहर देगांवकर, सुवर्णा जाधव, सायली कानडे, हेरंब जोशी, गजानन पाटील, प्रसाद सोनार, श्रीकांत झिपरे, मनोज इंगुले, सुर्यकांत सासवडकर, अनुपम जोशी, नंदकुमार जगदाळे, प्रकाश पाटील, अंजली खेरोडकर आदींसह उपस्थित हजारो भाविक भक्तांनी या भक्तीसंगीत उत्सव श्रवण सेवेचा अपार श्रध्देने आनंद लुटला.
फोटो ओळ – श्री वटवृक्ष मंदीरातल्या ज्योतीबा मंडपात भक्ती संगीत उत्सव सेवा सादरीकरण प्रसंगी गंधार इव्हेंटसचे अश्विन साखरे व सहकलाकार दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!