सोलापूर भीम प्रतिष्ठान चे वतीने शिवराज वमने यांना १० हजार रुपये मदत
सामाजिक बांधिलकी

सोलापूर भीम प्रतिष्ठान चे वतीने
शिवराज वमने यांना १० हजार रुपये मदत
वागदरी –
वागदरी येथील एम बी बी एस विद्यार्थी शिवराज वमने यांचे आर्थिक परिस्थिति गरीबीची असल्यामुळे, शिक्षक शिवानंद गोगाव यांच्या सांगण्यावरून सोलापूर येथील भीम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विरेंद्र हिंगमिरे यांचे हस्ते दहा हजार रू. ची आर्थिक मदत करण्यात आले. भीम प्रतिष्ठान आता पर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिति हलाकीची आहे. ज्यांना शिक्षण घेण्यास अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. अशा गरीब व होतकरू विद्यार्थी शोधुन त्यांना आर्थिक मदत करण्याचे काम करत आहे.
शुक्रवारी सोलापूर येथील भीम प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बाबा बाबरे, अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय बसव्रत्न पुरस्कार प्राप्त विरेंद्र हिंगमिरे, सचिव अकबर शेख यांनी वागदरी येथे शिवराज यांचे भेट घेवुन दहा हजार रू ची आर्थिक मदत केले. वागदरी महात्मा गांधी गाव तंटामुक्त अध्यक्ष शरणप्पा मंगाणे साहेब , ग्रा प सदस्य हनिफ मुल्ला, नागप्पा आष्टगी, शिवानंद गोगांव, चन्नबसय्या स्वामी सर, दत्तात्रय वमने, धुळप्पा ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी वमने कुटुंबा कडून अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे , बाबा बाबारे यांना शरणप्पा मंगाणे साहेब यांनी फेटा बांधून सत्कार करून मदतीसाठी आभार मानले .
