गावगाथाठळक बातम्या

Chinchwad | 31st party : “दूध प्या, दारूला नाही म्हणा”..! चिंचवड पोलीस ठाणे आणि नानक साई सेवा ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

चिंचवड (प्रतिनिधी ): चिंचवड पोलीस ठाणे आणि नानक साई सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने “दूध प्या, दारूला नाही म्हणा ” या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरीकांना हा संदेश देत दुध वाटप करण्यात आले . या उपक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि पोलीस उपनिरीक्षक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नानक साई सेवा ट्रस्टचे अध्यक्ष कमलजीत सिंग आणि उपाध्यक्ष जस्मीत सिंग यांनी केले.  या मोहिमेचा उद्देश समाजामध्ये आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देणे हा होता.

या प्रसंगी अनेक तरुण ज्येष्ठ वाहनचालक तसेच समाजातील अनेक व्यक्तींना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. “दूध प्या दारूला नाही म्हणा” या योजनेचा प्रचार प्रसार समाजात करावा अशी विनंती सर्वांना करण्यात आली. अनेकांनी स्वतः येऊन या उपक्रमाची माहिती घेतली आणि नानक साई सेवा ट्रस्ट करत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले .

या उपक्रमादरम्यान सुमारे २०० ग्लास दूध वाटप करण्यात आले. “स्वच्छ आणि आरोग्यदायी समाज” हा या मोहिमेचा मुख्य संदेश होता.

यावेळी  श्रीकृष्ण मुंडे, अनिल पवळ, सुभाष मालुसरे, धनंजय कुलकर्णी, राकेश सायकर, उदय वाडेकर , प्रकाश मिर्झापुरे, सुशील मालुसरे, मनोज पाटील प्रशांत शेनॉय, सतीश पोफळे, दत्ता दुधाळ, रफिक बागवान, वसंत ढवळे, मंगेश कवी आदी सदस्यांनी सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button