ग्रामीण घडामोडी

महात्मा फुले निराधारांचे न्याय प्रणेते – महेश इंगळे

महात्मा फुले पुण्यदिनानिमित्त स्विमिंग ग्रुपच्या वतीने अभिवादन

महात्मा फुले निराधारांचे न्याय प्रणेते – महेश इंगळे

महात्मा फुले पुण्यदिनानिमित्त स्विमिंग
ग्रुपच्या वतीने अभिवादन

प्रतिनिधी अक्कलकोट,
क्रांतीसुर्य, शिक्षणरत्न महात्मा जोतिबा फुले यांनी वंचित आणि निराधारांना न्याय मिळावा या करीता ‘सत्यशोधक समाज’ची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक निराधारांना शिक्षणाची वाट दाखवली. व अनेकांना न्याय दिला. त्यांची समाजसेवा पाहुन ११ मे १८८८ रोजी मुंबई येथे एका विशाल सभेत लाखोंच्या उपस्थितीत जोतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल करण्यात आली. त्यामुळे महात्मा फुले म्हणजे निराधारांचे न्याय प्रणेते असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले. आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यदिनाचे औचित्य साधुन येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुलेंच्या निष्ठेप्रती आज महात्मा फुलेंचे पुण्यदिन महात्मा दिन’ म्हणून साजरा करण्यात आले.
याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुलेंच्या प्रतिमेस स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते स्विमिंग ग्रुप सदस्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना महेश इंगळे यांनी
“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले।।” अश्या प्रभावी कवितेच्या माध्यमातून नागरिकांना शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाचा तळागाळापर्यंत प्रचार अन् प्रसार करणाऱ्या ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन! करण्यात आले असून विद्यार्थ्यांनीही व नागरिकांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्य डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य करावे असेही प्रतिपादन महेश इंगळे यांनी केले. याप्रसंगी स्विमिंग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, प्रथमेश इंगळे, सुनील पवार, सचिन किरनळ्ळी, अमर पाटील, चंद्रशेखर आडवीतोटे, अरविंद पाटील, श्रीकांत झिपरे, बाबा सुरवसे, शिवशंकर बिंदगे, प्रकाश शिंदे, बसवराज माळी, राजू एकबोटे, शैलेश राठोड, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button