वळसंग येथील श्री शंकरलिंग प्रशालेतील विद्यार्थ्याचे युनिसेफच्या कार्यशाळेसाठी निवड
वळसंग येथील श्री शंकरलिंग प्रशालेतील विद्यार्थ्याचे युनिसेफच्या कार्यशाळेसाठी निवड

वळसंग येथील श्री शंकरलिंग प्रशालेतील विद्यार्थ्याचे युनिसेफच्या कार्यशाळेसाठी निवड

वळसंग ता.द.सोलापूर फॅमिली प्लॅंनिंग
असोसिएशन ऑफ इंडिया आणि युनिसेफ यांच्या मार्फत मुंबई येथे संपन्न होणाऱ्या कार्यशाळेला श्री शंकरलिंग प्रशाला,वळसंग येथील इयत्ता नववीमधील कुमार सोमनाथ शिवानंद खराडे याची निवड झाली आहे.सदर विद्यार्थ्यास कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे नियुक्ती पत्र स्कुल कमिटीचे चेअरमन श्री शिवशरण थळंगे यांच्या हस्ते पर्यवेक्षक शिवानंद घोडके , समन्वयक सिद्धारूढ हिरेमठ ,वीरेंद्रसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.संस्थाध्यक्ष श्रीशैल दुधगी, विश्वनाथ थळंगे, प्रकाश दुधगी, शिवशरण प्याटी व प्राचार्य वीरेश थळंगे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांच्यावतीने सोमनाथ खराडे यास शुभेच्छा देण्यात आले. ग्रामीण भागातून सदर विद्यार्थ्यांचे मुंबई येथे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन व युनिसेफ यांच्या मार्फत होणाऱ्या कार्यशाळेस निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे💐💐💐💐💐💐