ऑस्ट्रेलियन संस्कृतीतही रुजली आहे स्वामी भक्ती – विजयसिंह शिंदे
अनिवासी भारतीयांच्या स्वामीभक्तीने ऑस्ट्रेलियातील नागरिकांना अध्यात्माची महती समजली.

ऑस्ट्रेलियन संस्कृतीतही रुजली आहे स्वामी भक्ती – विजयसिंह शिंदे

अनिवासी भारतीयांच्या स्वामीभक्तीने ऑस्ट्रेलियातील नागरिकांना अध्यात्माची महती समजली.

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१४/१२/२२) – या पृथ्वीवर ज्या ठिकाणी सर्वप्रथम सूर्योदय होतो अशा कांगारूंच्या खंडातील ऑस्ट्रेलियात भारतापेक्षा खूप वेगळे वातावरण आहे. कालांतराने आमच्यासारखे अनेक भारतवासी आंतरराष्ट्रीय उद्योगधंदे व व्यवसाय नोकरी निमित्त जगभरातील विविध देशात स्थायिक झाले आहेत. त्यामध्ये भारतीयांचा ऑस्ट्रेलियात काम करण्याचा जास्त मानस आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेक अनिवासी भारतीय ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहेत. त्यामध्ये मी ही एक भारतीय या नात्याने गेल्या अनेक वर्षापासून ऑस्ट्रेलिया खंडातील न्युझीलँडमध्ये स्थायिक होतो. आता ऑस्ट्रेलियन शासनाच्या नेमणुकीनुसार ऑस्ट्रेलियात स्थायिक व्हावे लागले आहे. अनेक भारतीय येथे स्थायिक झाले असले तरी आपली भारतीय संस्कृती रूढी परंपरांचा त्यांना विसर पडलेला नाही. मग त्यात अध्यात्माचा तरी कसा विसर पडेल. येथे स्थायिक झालेले अनेक अनिवासी भारतीय आपापल्या देवतांना स्मरत असतात. व त्यांची नित्यनेमाने पूजाअर्चा करीत असतात. या माध्यमातून अनेक स्वामी भक्तही येथे स्थायिक आहेत. त्यात माझाही समावेश आहे. अनेक भारतीयांची स्वामी भक्ती पाहून ऑस्ट्रेलियन नागरिक भारत व भारतीय संस्कृतीचा महिमा व गोडवे गातात. येथील अनिवासी भारतीयांच्या स्वामीभक्तीच्या अभिमान बाळगतात, त्यामुळे आता हळूहळू का होईना ऑस्ट्रेलियन संस्कृतीतही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्याचा व स्वामी समर्थांची स्वामी भक्ती रुजलेली आहे असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियन ब्रिजमेंट सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त संपतराव शिंदे यांचे सुपुत्र विजयसिंह शिंदे यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी शिंदे बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, भीमा मिनगले, मनोज काळे, प्रसाद सोनार, संजय पवार, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – विजयसिंह शिंदे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
