अंबाबाई भक्तांना महाप्रसाद वाटप — सामाजिक कार्याचा सुंदर उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर येथील सैफुल भागात श्री बसवेश्वर महामंडळ व जागतिक लिंगायत महासभा सोलापूर शाखा (सैफुल) यांच्या वतीने अंबाबाईच्या भक्तांसाठी महाप्रसाद वाटपाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रसप्पा गुरुभट्टी यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
रविवारी सकाळी सैफुल परिसरातून कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी निघालेल्या पायी यात्रेकरूंना प्रेमाने महाप्रसाद वाटप करण्यात आला. या प्रसंगी ग्रुप एटी यांच्या नेतृत्वाखाली काही होतकरू मंडळी व श्रद्धावान भक्तांनी लाडू, चिवडा, पाण्याच्या बाटल्या तसेच इतर खाद्यपदार्थांचे वितरण केले.
या सामाजिक उपक्रमात सिद्धाराम गुरुभट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात्रेकरूंनी या सेवेचा आनंद घेत आयोजक मंडळाचे आभार मानले. उपस्थितांनी चंद्रसप्पा गुरुभट्टी यांच्या सामाजिक जाणिवा व सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसाद वाटप कार्यक्रमामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजहितासाठी कार्यरत असणाऱ्या गुरुभट्टी परिवाराचे आणि ग्रुप एटीच्या सर्व सदस्यांचे या कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia
gem visa