दोनदा अपयश पण तिसऱ्या प्रयत्नात पोस्ट काढली, अंगणवाडी सेविकेची लेक PSI झाली
खुलताबादची पुजा झाली पीएसआय, अभ्यासात सातत्य ठेवल्यानेच यश

दोनदा अपयश पण तिसऱ्या प्रयत्नात पोस्ट काढली, अंगणवाडी सेविकेची लेक PSI झाली

खुलताबादची पुजा झाली पीएसआय, अभ्यासात सातत्य ठेवल्यानेच यश
वडिलांच्या निधनानंतर मुलांसाठी आईचा संघर्ष,पोरीनही जाणं ठेवली
दोनदा अपयश आलं पण खचली नाही, तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं

छत्रपती संभाजीनगर: लहानपणापासूनच पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न होतं. वयाच्या सहाव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरवलं. कुटुंबाच्या जबाबदारीचं ओझ आईच्या खांद्यावर पडलं.आईने अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी करत मुलांना शिकवलं. मुलीनेही आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवत जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं अन् पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. यामुळे नवविवाहित पूजा काळे आता पोलीस उपनिरीक्षक झाली आहे.
मुळची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तजनापुर या छोट्याश्या खेडे गावातील पुजा तेजराव काळे असे पोलीस उपनिरीक्षक झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. पुजाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. पुजाचे आई वडील शेती करत मात्र, पूजा सहा वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. यामुळे कुटुंब आणी मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या आईवर आली.
अचानक संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडल्यानंतर आईनेही खचून न जाता जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी सुरू केली. अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असताना आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठबळ दिलं. पूजाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं तर माध्यमिक शिक्षण बाजार सावंगी येथे झालं आहे तर तिने खुल्या विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे.

वडील गावोगावी जाऊन कपडे विकतात, आई कंपनीत कामाला; लेकीनं पांग फेडलं, दिवस-रात्र मेहनत केली अन् आज PSI
बारावी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दहा महिने खाजगी क्लासेस लावले त्यानंतर स्वतःच अभ्यास सुरू केला. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मोबाईलचा वापर खूप कमी केला. इतर सोबतची मुलं १२-१२ तास अभ्यास करत असताना मी फक्त पाच ते सहा तास अभ्यासाला वेळ दिला. मात्र, त्यावेळी अभ्यास करतांना कुठेच तडजोड केली नाही. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या व्यतिरिक्त कुठल्याच परीक्षेला प्राधान्य दिले नाही. एकाच परीक्षेचा सातत्याने सराव केला.
सुरुवातीला एक दोन परीक्षेमध्ये अपयश आलं. तिसरी प्री पास झाले त्यानंतर पहिली मेन्स परीक्षा देत असताना ती देवाला दिली असे म्हणून सोडून दिली मात्र त्याच परीक्षेत मला चांगले मार्क मिळाले. या परीक्षेत एवढे मार्क होते की इंटरव्यू आणि ग्राउंड त्यामध्ये निघून जाईल असं तेव्हाच वाटलं होतं. मी यामध्ये पास होईल असा विश्वास यामुळे आल्याचे पुजाने सांगितले. आमचं छोटसं खेडेगाव आहे या गावांमध्ये शिक्षणाच्या सुविधा नसताना, वडिलांचे छत्र हरपले नंतर आईने आम्हाला कष्टाने शिकवलं. भावाने विश्वासाने आम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. लग्नानंतरही माझ्या शिक्षणाला पतीने सपोर्ट केला यामुळे आज मी पोलीस उपनिरीक्षक झाले आहे, याचे सर्व श्रेय माझ्या कुटुंबीयांना जातं असं पुजा काळे सांगते.
माझी बहीण पोलीस उपनिरीक्षक झाली, मला तिचा अभिमान वाटतोय असे म्हणत भाऊ स्वप्निल काळे यांनी बहिणीचे कौतुक केले. तिच्या प्रवासामध्ये अनेक चढउतार आले तिने सातत्याने अभ्यास केला आईने आणि मी तिला आर्थिक, मानसिक सपोर्ट केला. स्पर्धा परीक्षा ही लॉन्ग प्रोसेस असते यामध्ये लगेच यश मिळेल असं नाही. यामुळे कुटुंबियांनी मुलांवरती विश्वास ठेवावा यामध्ये नक्कीच यश मिळतं रस तिचा भाऊ स्वप्निल काळे सांगतो.
लॉकडाऊनमध्ये आमचं लग्न झालं त्यानंतर घरामध्ये राहून अभ्यास केला. शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दोन्ही बाजू बॅलन्स केल्या. अभ्यासात सातत्य राखल्यामुळे आज माझी पत्नी पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. त्यामुळे मला तिचा अभिमान वाटतो, प्रत्येक पुरुषाने महिलेच्या पाठीमागे उभे राहावं यात नक्कीच यश मिळतं अशा शब्दात पुजाचे पती यांनी आनंद व्यक्त केला.
