यशोगाथा

करजगीच्या उमेद महिलांची प्रेरणादायी यशोगाथा 

करजगीच्या उमेद महिलांची प्रेरणादायी यशोगाथा 

करजगीच्या उमेद महिलांची प्रेरणादायी यशोगाथा 
———————————————–

HTML img Tag Simply Easy Learning    

आज मला माझ्या गावातील उमेद अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांचा ग्रामसंघच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हजेरी लावण्याची संधी मिळाली. मी गेल्या 4-5 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात महिला सबलिकरण साठी काम करत आहे. त्याच पार्श्वभूमीवार माझ्या स्वतःच्या गावातील बचत गटातील महिलसोबत अनेकदा चर्चा होत असते. आज आपल्या गावातीलच लोकांना आपल्या गावातील महिलांनी केलेल्या कर्तृत्व माहित नाही. आपल्या गावात आपल्याला फक्त नकारात्मक गोष्टीच आजपर्यंत दिसत आलेले आहे. पण काही सकारात्मक बाजू देखील आहेत ते गावातील सर्व लोकांना समाजावा म्हणून हा शब्द परपंच….

HTML img Tag Simply Easy Learning    

आजवर बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा लेखजोखा आपल्यसमोर मांडताना अतिशय आनंद होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आजपर्यंत खूप मोठी आर्थिक उलाढाल केलीली आहे. गावात एकूण 3 ग्रामसंघ, 90 बचत गट आहेत आणि ह्या बचत गटाशी एकूण 922 महिला जोडल्या गेले आहेत. त्याचा वार्षिक एक कोटी 65 लाख रुपयेचा आर्थिक उलाढाल असतो. आजपर्यंत तीन ग्रामसंघना मिळून 7 लाख 20 हजार CAF निधी व 1.5 लाख VRF निधी मिळाली आहे. 2.25 लाख रुपये ‘स्टार्टअप’ निधी मिळाली आहे. परसबाग निधी म्हणून 72 हजार रुपये मिळाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पारदर्शक कारभार हा कोणत्याही उपक्रमचा यशाचा किल्ली असते. ह्या महिलांना अतिशय पारदर्शकता जोपासून काम करतात म्हणूनच 0 NPA आहे. शून्य टक्के कर्ज थकीत असणे हे त्यांचे जमेची बाजू आणि कौतुकस्पद आहे. महिला असून देखील एक रुपया देखील कर्ज थकीत नाही ही त्यांच्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. ह्याची प्रेरणा गावातील पुरुष मंडळींनी देखील घ्यायला पाहिजे.

HTML img Tag Simply Easy Learning    

आजपर्यंत ह्या महिला बचत गटाला राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध पुरुस्कार मिळाले आहेत. आपल्या गावातील महिला ह्या अतिशय हुशार व महत्वाकांक्षी आहेत. त्याच्याकडे बरेच कौशल्य आहेत. त्यांना फक्त गरज आहे गावातील लोकांचा पाठबळाची. ह्या महिला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतात. त्याचा एक चांगला प्रदर्शन व विक्री लावण्याचा माझा मानस आहे. त्यास गावातील सर्व लोकांनी प्रोत्साहन दयावे असे मी अहवान करतो. महिलांच्या ह्या कौतुक सोहळ्यास सर्व चांगला प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती.

HTML img Tag Simply Easy Learning    

महिला ग्रामसंघाचे नावे :
ॐ महिला ग्राम संघ
तिरंगा महिला ग्रामसंघ
ध्वजा महिला ग्रामसंघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button