गळोरगी येथील सलग अठराव्या शिबिरात 62 जणांचे रक्तदान.
श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच गळोरगी चा एक अभिनव उपक्रम

गळोरगी येथील सलग अठराव्या शिबिरात 62 जणांचे रक्तदान.

(श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच गळोरगी चा एक अभिनव उपक्रम)

गळोरगी ता.अक्कलकोट येथील श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव निमित्त श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच व गळोरगी ग्रामस्थ आणि श्री गोपाबाई दमाणी रक्तपेढी व श्री अश्विनी सहकारी रूग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकुण 62 जणांनी ऐच्छिक रक्तदान केले.शिबिराचे यंदाचे हे सलग अठरावे वर्ष होते.आतापर्यंत झालेल्या एकूण शिबिरात गळोरगी ग्रामस्थां मार्फत सुमारे 1500 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे त्यापैकी गावातील गरजूंना आणि त्यांच्या नातेवाईकांना 300 युवा मंच मार्फत मोफत दिल्या गेल्या आहेत.गळोरगी हे गाव अगदी लहान असुन संपूर्णअक्कलकोट तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात रक्तदान बाबत एक आदर्श गाव बनले आहे.

गळोरगी ग्रामदैवत श्री रेवणसिध्देश्वर महाराज यांचे फोटो पूजन प्राध्यापक वे.महारूद्रय्या स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले आणि शिबिराचे उदघाटन सरपंच श्री वहिदपाशा शेख यांनी केले.प्रास्ताविक सुत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सिकंदर जमादार यांनी केले तर आभार आय काॅग्रेस अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील यांनी मानले.सलग अठरा वर्ष शिबिर यशस्वीपणे राबविल्या बद्दल सर्व रक्तदात्यांचे,युवामित्रांचे आणि गळोरगी ग्रामस्थांचे युवा मंच संस्थापक अध्यक्ष श्री सिध्देश्वर बिराजदार यांनी विशेष आभार मानले.

याप्रसंगी श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गळोरगी ग्राम अध्यक्ष श्री राजशेखर अंदोडगी,नागनह्ळळी आश्रम शाळेचे सहशिक्षक श्री बसवराज बिराजदार सर, वे. शरणय्या स्वामी, पुणे येथील व्यवसायिक श्री चेतन निरोणे,श्री हणमंत मणूरे,श्री मौलासाब शेख, युवानेते श्री रामेश्वर बिराजदार, श्री बसवराज गोब्बुरे ,श्री हणमंत पाटील आणि समस्त गळोरगी ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी वे.गंगाधर स्वामी,श्री महेश बिराजदार,तंटामुक्त अध्यक्ष श्री सिध्दाराम बिराजदार,श्री योगिराज मैंदर्गी,वे.विनायक स्वामी,श्री सातलिंग आजूरे,वे अथर्व मठपती,श्री शिवनिंगप्पा अंदोडगी, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री शिवकुमार कौटगी,श्री शिवपुत्र पाटील,श्री विशाल बिराजदार,श्नी नागेश पाटोळे,श्री सिध्दाराम म्हाळू,श्री महेश झग्गे, श्री शरण पाटील,श्री सिध्दाराम बडदाळे,श्री कैलास अळगी,श्री सचिन बणजगोळ,श्री अनमोल कुंभार,श्री मल्लिकार्जून हडपद,श्री रेवणसिध्दप्पा पुजारी,श्री सचिन हिळ्ळी,श्री पृथ्वीराज बिराजदार,श्री नागप्पा जाधव,श्री यल्लप्पा महिंद्रकर,श्री मल्लिकार्जून मुलगे,श्री बसवराज जकापूरे,श्री चौडप्पा जमादार,श्री शांतप्पा पुजारी आणि समस्त गळोरगी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले
