गावगाथा

स्वामी कृपेच्या कृपावस्त्रातून आत्मसन्मान झाला – महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडीक

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदीरात सत्कार झाल्यानंतर कृष्णराज महाडीक यांचे मनोगत.

स्वामी कृपेच्या कृपावस्त्रातून आत्मसन्मान झाला – महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडीक

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदीरात सत्कार झाल्यानंतर कृष्णराज महाडीक यांचे मनोगत.

(श्रीशैल गवंडी, दि.१८/०५/२६. अ.कोट) – अनेक स्वामी भक्तांप्रमाणे मीही श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे. येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीच्या सन्मानातून भाविकांना स्वामी कृपावस्त्र लाभून सन्मान होत असतो. मी भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता व युवा नेतृत्व व्यक्ती आहे. आज येथे देवस्थानचे युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते झालेला माझा सन्मान म्हणजे स्वामी कृपेच्या कृपावस्त्रातून झालेला आत्मसन्मानच असल्याचे मनोगत
महाराष्ट्र राज्याचे भा.ज.पा.युवा
मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडीक
यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी भा.ज.पा.युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडीक व सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेश दादा बिराजदार यांचा श्री स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी भा.ज.पा.युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडीक बोलत होते. पुढे बोलताना कृष्णराज महाडीक
यांनी राजकारणाशी संलग्न व्यक्तींचा
अनेक ठिकाणी मान सन्मान होतच असतो, परंतु स्वामी समर्थांच्या या पावनभूमीत व त्यांच्या वटवृक्ष मंदिरातील निवासात स्वामींचे कृपावस्त्र लाभून सन्मान होणे म्हणजे माझ्या सहीत भारतीय जनता पार्टीचेही आत्मसन्मान झाले आहे असेही मनोगत व्यक्त करून पुढील जीवन वाटचालीस व कारकीर्दीस स्वामी समर्थांचे आशीर्वाद लाभावे याकरिता त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले असल्याचे स्पष्टीकरण केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, भाजपा पदाधिकारी प्रदीप पाटील,
महेश बिराजदार, सिद्धार्त पाटील, अमोल महाडीक, लखन गवळी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, शिवशरण अचलेर, विपूल जाधव, सागर गोंडाळ आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – महाराष्ट्र राज्य भाजपा युवा
मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडीक यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button