महेश इंगळेंचे कार्य स्वामीभक्ती प्रसार कार्यास दिशा देणारी – न्यायमूर्ती प्रभूदेसाई
न्यायमूर्ती प्रभूदेसाईंचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230121-WA0054-355x470.jpg)
महेश इंगळेंचे कार्य स्वामीभक्ती प्रसार कार्यास दिशा देणारी – न्यायमूर्ती प्रभूदेसाई
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे हे वटवृक्ष मंदिर म्हणजे या भूतलावरील नंदनवन आहे. स्वामींच्या या नंदनवनास असंख्य भाविक अत्यंत श्रद्धेने भेट देऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होतात. अशा या पावन तीर्थक्षेत्रातील स्वामी समर्थांच्या नंदनवनाची सेवा करण्याचे भाग्य महेश इंगळे यांना लाभले आहे. स्वामी समर्थांनी दिलेली सेवा गोड मानून महेश इंगळे हे अत्यंत समर्पित जीवनशैलीच्या कार्यातून आलेल्या भाविकांची सेवा करतात. मंदिर समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्वामीभक्ती प्रचार प्रसार कार्याची कामे केल्याने भाविकांची स्वामींवरील श्रद्धा दृढ होत चालली आहे. त्यामुळे एका अर्थाने महेश इंगळे यांचे स्वामी सेवेचे कार्य हे स्वामीभक्ती प्रसार कार्यास दिशा देणारी ठरत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी केले.ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी न्यायमूर्ती प्रभूदेसाईंचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी न्यायमूर्ती प्रभूदेसाई बोलत होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती प्रभूदेसाई यांनी स्वामीभक्तीच्या या प्रसार कार्यातून महेश इंगळे यांनी अनेक स्वामी भक्तांना स्वामी समर्थांच्या या भक्ती साखळीत जोडून अनेक भाविकांना भक्ती मार्गाची दिशा दाखविली असल्याचे मनोगतही न्यायमूर्ती प्रभूदेसाई यांनी केले. याप्रसंगी पीआय विनोद घुगे, एपीआय पुजारी, स्वप्निल मोरे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, संजय पवार, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाईंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)