श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद लाखमोलाचे – अभिनेत्री तावडे
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेच्या यशाकरीता स्वामींचरणी नतमस्तक

श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद लाखमोलाचे – अभिनेत्री तावडे

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेच्या यशाकरीता स्वामींचरणी नतमस्तक

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.९/८/२३) –
(SHRISHAIL GAVANDI)
अनेक स्वामी भक्तांप्रमाणे मी व माझे टीमही स्वामी भक्त असणे स्वाभाविक आहे. या औचित्याने आज आमच्या टीमचे छोट्या पडद्याच्या झी मराठी वरील कार्यकारी निर्माती भाग्यश्री कारेकर यांनी निर्माण केलेली व झी मराठी वाहिनीवर येत्या २१ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७ वाजता प्रसारीत होणारी ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेच्या यशाकरीता आज माझ्यासह आमच्या टीमने स्वामींचरणी नतमस्तक झालो असल्याचे मनोगत ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील छोट्या पडद्यावरील मुख्य कलाकार अभिनेता अशोक शिंदे, अभिनेत्री खुशबू तावडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील आपल्या संघ सहकाऱ्यांसोबत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामीचरणी नतमस्तक होत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अभिनेता अशोक शिंदे, अभिनेत्री खुशबू तावडे, झी मराठी प्रसिद्धी पुरुषोत्तम गोखले, झी मराठी डिजिटल मार्केटिंग प्रद्युत घोगळे व सर्व कलाकारांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. याप्रसंगी अभिनेत्री तावडे बोलत होत्या. पुढे बोलताना तावडे यांनी या कामी समर्थांचे आशिर्वाद आमच्याकरिता लाखमोलाचे असल्याने ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेच्या यशाकरीता आम्ही स्वामींचरणी नतमस्तक झालो असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यापसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, आकाश शिंदे, संजय पवार, आशिष हुंबे, सागर गोंडाळ, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सचिन हन्नूरे इत्यादी उपस्थित होते.

ssgavandi007@gmail.com

फोटो ओळ – अभिनेता अशोक शिंदे, अभिनेत्री खुशबू तावडे, झी मराठी प्रसिद्धी प्रमुख पुरुषोत्तम गोखले, झी मराठी डिजिटल मार्केटिंग प्रमुख प्रद्युत घोगळे यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
