ठळक बातम्या
Pune : पुणे ‘हिट ॲन्ड रन’ अपघात प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन
पुणे (प्रतिनिधी): पुणे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ आणि ‘हिट ॲन्ड रन’ अपघात प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आज दि.(24 मे) रोजी निलंबित केलेले आहे. तपासात दिरंगाईपणा केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा आरोप ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे.

पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावे आहेत.निलंबित करण्यात आलेले हे दोन्ही पोलीस अधिकारी येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी कामावर होते
