ग्रामीण घडामोडी

अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात

पहिल्या दिवशी माजी आमदार व अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील गटाकडून अर्ज दाखल

अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात

पहिल्या दिवशी माजी आमदार व अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील गटाकडून अर्ज दाखल

अक्क्लकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शुक्रवार पहिल्या दिवशी माजी आमदार व अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील गटाकडून अप्पासाहेब पाटील, बसलिंगप्पा खेडगी, सिद्रामप्पा पाटील, सिध्दप्पा गड्डी, बाबुशा करपे, स्वामीराव पाटील, संजीव अंबाजी पाटील, श्रीमंत कुंटोजी, शरणप्पा मंगाणे, संजीव सिद्रामप्पा पाटील या 10 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गेल्या 8 वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना सुरु करण्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आली. कार्यक्षेत्रातील ऊसाचे क्षेत्र पाहता न परवडणारे असल्याने आगामी गळीत हंगामाकरिता सज्ज करण्यात आला आणि अवघ्या काही महिन्यातच कारखानची निवडणुक लागली आहे. सिद्रामप्पा पाटील यांचे सन 1999 पासून स्वामी समर्थ साखर कारखान्यावर वर्चस्व आहे. सहकार क्षेत्रात गेल्या 50 वर्षापासून पाटील हे कार्यरत आहेत. वयाची तमा न बाळगता आजही कारखान्याच्या निवडणुकीत युवकाप्रमाणे धावपळ सुरु आहे. या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आप्पांच्याच बाजुने असल्याने पाटील गटाचे पारडे जड आहे. सदरची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी तमाम शेतकरी सभासदातून होत आहे.
कारखान्याची सभासद संख्या 20 हजार 555 इतकी असून एकूण 21 संचालक असणार आहेत. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून 1, ऊस उत्पादक मतदारसंघातून 15, अनुसूचित जाती-जमाती 1, भटक्या विमुक्त जाती 1, महिला राखीव 2, विशेष मागासवर्गीय 1 असे संचालक मंडळ असणार आहेत. उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटची मुदत दि.16 मार्च पर्यंत राहणार असून अवघ्या चार दिवसात निवडणूक लागणार की अविरोध होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पहिल्या दिवशी ऊस उत्पादक गट – अक्कलकोट गटातून विद्यमान संचालक व बाजार समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब पाटील (चपळगाव), साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी (अक्कलकोट), सुलेर जवळगे गटातून – विद्यमान अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील (कुमठे), सिध्दप्पा गड्डी (शेगाव), बाबुशा करपे (पानमंगरुळ), वागदरी गट – स्वामीराव पाटील (कुरनूर), संजीव अंबाजीप्पा पाटील (चुंगी), श्रीमंत कुंटोजी (भुरिकवठे), शरणप्पा मंगाणे (वागदरी), सोसायटी मतदारसंघातून संजीवकुमार सिद्रामप्पा पाटील अशा दहाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे काम पाहत आहेत.
निवडणूक अक्कलकोटच्या स्वामी समर्थ कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सोलापूरातून, गत मोहोळ तालुक्यातील भीमा कारखान्याची निवडणूक झाली त्याप्रमाणे अक्कलकोट कारखान्याची देखील निवडणूकीची प्रक्रिया ही सोलापूरातील जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयातून आखली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेतकरी सभासदांना सोलापूरात जावे लागणार आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्यावर सहकार खात्याची वाढलेली जबाबदारी पाहता सदरची निवडणूक प्रक्रिया ही सोलापूर येथे ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकरी सभासदांची पैसे व वेळ अन्य अडचणी पाहता अक्कलकोट येथील सहा.निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असती तर बरे झाले असतं, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button