तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांचा वाढदिवस अन्नछत्र मंडळात संपन्न..
न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते डॉ. अश्विन करजखेडे यांचा छत्रपती शिवरायांची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांचा वाढदिवस अन्नछत्र मंडळात संपन्न..
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांचा वाढदिवस अन्नछत्र मंडळात संपन्न झाला.

न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते डॉ. अश्विन करजखेडे यांचा छत्रपती शिवरायांची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या समवेत महेश भोरे,पी.एस. सोनटक्के, एस.एस. शेरीकर, बाबू पवार, एस.एस. लोकापुरे, परमेश्वर बिराजदार, आर.एस. स्वामी हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मनोज निकम, शीतल जाधव, पुरोहित संजय कुलकर्णी, निखील पाटील, प्रशांत शिंदे, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, देवराज हंजगे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

