महाराष्ट्राचा खली उमेश वसवेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कारम हेश इंगळेंनी स्वामींचे कृपावस्त्र देऊन केला वसवेंचा सन्मान
उमेश वसवेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

महाराष्ट्राचा खली उमेश वसवेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कारम हेश इंगळेंनी स्वामींचे कृपावस्त्र देऊन केला वसवेंचा सन्मान

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१/४/२३) – महाराष्ट्राचा खली अशी विशेष ओळख असलेले उमेश वसवे यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष श्री स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला.यावेळी बोलताना वसवे यांनी श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव हा मोठ्या श्रद्धेने साजरा होत असल्याने या काळात मी आवर्जून येथील श्री उत्कृष्ट स्वामी महाराज मंदिरास वेळ देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, नागनाथ गुंजले, श्रीकांत मलवे, आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – उमेश वसवेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
