स्वामी दर्शन व मंदीर समितीचे नियोजन पाहून प्रभावीत झालो – जिल्हाधिकारी आशिर्वाद
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामी दर्शन व मंदीर समितीचे नियोजन पाहून प्रभावीत झालो – जिल्हाधिकारी आशिर्वाद


(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८.८.२३)
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे यासाठीही खूप मोठ भाग्य लागतो. आज जीवनात भारतीय प्रशासन सेवेचा सेवक असून सुद्धा स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याची पर्वणी आजपर्यंत आपल्याला लाभलेली नव्हती. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट दिल्यानंतर मंदिरातील स्वच्छता, भाविकांना स्वामी दर्शनाचे नियोजन, मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेतल्यानंतर स्वामी दर्शनाने आपण भारावलो आहे, म्हणून स्वामी दर्शन व मंदिर समितीचे नियोजन पाहून आपण खूपच प्रभावित झालो असल्याचे मनोगत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र शासन म्हाडा कॉलनीचे उपाध्यक्ष संजय जैस्वाल, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ, मंडल अधिकारी ओंकार माने, अक्कलकोट नगरपरिषदचे नगर अभियंता मल्लय्या स्वामी, कार्यअधीक्षक मलिक बागवान, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, म्हेत्रे तलाठी, गिरीश पवार, विपुल जाधव, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
