ग्रामीण घडामोडी

कुरनूर येथील ब्रह्मनंद मोरे प्रतिष्ठानचे कार्य समाजाला दिशादर्शक

१७९ जणांनी केले रक्तदान

कुरनूर येथील ब्रह्मनंद मोरे प्रतिष्ठानचे
कार्य समाजाला दिशादर्शक

HTML img Tag Simply Easy Learning    

१७९ जणांनी केले रक्तदान

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट,दि.: अक्कलकोट
तालुक्यात लोकनेते स्व.ब्रह्मानंद कृष्णात
मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे या कार्याने चांगली समाज सेवा घडत असून ही सेवा उत्तरोत्तर अशाच प्रकारे वाढत राहावी.मोरे बंधूंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत,असे विधान परिषदेचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.बुधवारी,लोकनेते स्व. ब्रह्मानंद
मोरे प्रतिष्ठानच्यावतीने मोरे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक विश्वनाथ
भरमशेट्टी हे होते.प्रारंभी मोरे यांच्या
प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले,माणूस जन्माला आल्यानंतर
समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये ठेवून आई-वडिलांना दैवत मानून
मोरे प्रतिष्ठानने कार्याचा विस्तार वाढविला आहे.केवळ कुरनूर व आसपासच्या खेड्यातच
नव्हे तर अक्कलकोट तालुक्यात अतिशय व्यापक प्रमाणात हे काम त्यांनी सुरू केले
आहे.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ देखील नागरिकांना द्यावा. जेणेकरून तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या लोकहिताच्या योजना पोचू शकतील आणि त्यांचाही विकास होऊ
शकेल.मोरे प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात
येत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त
करून हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब
मोरे यांनी दरवर्षी मोरे प्रतिष्ठान राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली तसेच येत्या ९ तारखेला अक्कलकोटमध्ये प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर
यांचे व्याख्यान आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.लोकनेते स्वर्गीय ब्रम्हानंद मोरे
यांचे काम गोर गरीब वंचित जनतेला दिलासा देणारे होते.त्यांचे अधुरे स्वप्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण होत आहे,असे ह.भ.प
आबा महाराज कुरनूरकर यांनी सांगितले.
यावेळी अंबाबाई मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात १७९
जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती स्वामीराव पाटील,सिद्धार्थ गायकवाड,उद्योजक स्वामीनाथ जाधव,किणीचे माजी सरपंच अण्णप्पा अळळीमोरे,युवा नेते प्रमोद मोरे,तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे,राजेंद्र मोरे,प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विनोद मोरे,
चेतन मोरे,शाम चेंडके,काशिनाथ
काळे,जिंदा पठाण आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश मोरे,अशोक शिंदे,लक्ष्मण शिंदे,महेश काळे,किशोर काळे,मोहन शिंदे,अण्णा पवार,रानबा काळे,हरी पवार,हरी
काळे,बाळू कांबळे,डॉ.रणजित शिंदे,
भास्कर काळे,अमोल मोरे,राम शिंगटे,
रफिक तांबोळी,सहदेव लोहार,सतीश काळे,भागवत पवार आदींनी प्रयत्न
केले.या शिबिरासाठी सिद्धेश्वर ब्लड
बँकेचे सहकार्य लाभले.

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट :-

HTML img Tag Simply Easy Learning    

गावातील माजी
सैनिकांचा सन्मान

HTML img Tag Simply Easy Learning    

कुरनूर येथील मेजर प्रशांत मोरे ,माजी
सैनिक भास्कर मोरे, नीलप्पा लोहार,संतोष काळे ,बापूराव सुरवसे, नागनाथ कोकरे, रामचंद्र उर्फ तम्मा कोळी यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्यांचा प्रतिष्ठानच्यावतीने
सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button