ग्रामीण घडामोडी

माझे वाढते वय पाहता, यंदाची निवडणूक ही अखेरची असून मी यापूढे निवडणूक लढवणार नाही.माजी आमदार सिद्रामप्पा पाटील

निवडणूक नामा

*🔶अक्कलकोट* दि.२६ : (प्रतिनिधी)
*माझे वाढते वय पाहता, यंदाची निवडणूक ही अखेरची असून मी यापूढे निवडणूक लढवणार नाही. मात्र सज्जन लोकांच्या पाठीशी राहाऊन दुर्जन गोल्डन गँगला माझा शेवटच्या श्वासापर्यंत विरोध कायम असणार आहे अशी घोषणा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केली.*

मी वयाच्या १६ व्या वर्षांपासून सतत संघर्ष करत अन्याय विरुद्ध लढत आलो आहे. माझ्या जीवनात गद्दारापेक्षा चांगले लोक अधिक भेटले ते गोरगरीब घटकातील आहेत. मूठभर गद्दारानी मात्र माझ्याजवळ राहाऊन प्रत्येक निवडणूकित मलाच धोका देण्याचा काम केलेले आहेत. त्यांचे नाव आहे “गोल्डन गॅंग”, केवळ सर्वसामान्य लोकांच्या मदतीने नेहमी सर्वच क्षेत्रात मी सुरक्षित राहिलेले आहे.

माझे वय सध्या ८५ वर्ष असून वयोमानानुसार अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे मी यापुढील काळात कोणतेही निवडणूक लढवणार नाही. यंदाची बाजार समिती निवडणूक अखेरची असणार आहे. यासाठी मागील अनेक वर्षोपासून माझ्या सोबत निष्ठेने राहिलेले लोक आजही राहतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. काही मिनी नेते राजकिय पदासाठी नसून निवडणूकित सतत आर्थिक डल्ला मारण्यासाठी प्रयत्नवादी असतात. तब्बल १५ वर्षे भाजप म्हणून माझ्या सोबत राहाऊन मलाच धोका देत पैसे कमवण्याचे देण्याचा काम केले आहेत. असे आरोप सिद्रामप्पा पाटील यांनी केले.

यावेळी पत्रकार परिषदेत श्रीमंत कुटोंजी, राजकुमार बंदिछोडे, संजय पाटील, आप्पासाहेब पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी, मल्लिनाथ दुलंगे, विश्वनाथ दोड्याळे, आदीजण उपस्थित होते.

*चौकट :* मल्लिकार्जुन पाटील म्हणजे राजकीय सौदाचा सौदागर आहेत. मागील अनेक वर्षांपासून नागरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आशा विविध निवडणूकित एखादा उमेदवार निवडून आणायचे आणि त्याचे सौदा करून पैसे कमवायचे हा त्यांचे धंदा तालुक्याला सर्वस्तृत आहे. नागरपालिक निवडणूकित २५ लाखाला स्वामी नावाच्या नगरसेवकाला विक्री केले. ते पैसे हडप केले. दोन पिढ्या पासून प्रामाणिक राहिलेल्या स्वामींचे सुद्धा इन्कम सोडले नाहीत. राजकीय परिस्थिती पाहवून कधी भाजप, कधी राष्ट्वादी तर कधी काँग्रेस असे सतत दलबदलु लोकांनी आम्हाला राजकीय निष्ठा शिकवू नये असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button