अक्कलकोट व दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची दोन माजी आमदाराची अस्तित्वाची लढाई ठरणार आहे
निवडणूक ही आरोप-प्रत्यारोपानी गाजत आहे
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/04/4krushi_utpanna_bazar_samiti.jpg)
अक्कलकोट व दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची दोन माजी आमदाराची अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.अक्कलकोट,* दि.26 : (प्रतिनिधी) *अक्कलकोट व दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आरोप-प्रत्यारोपानी गाजत असून अत्यंत चुरशीने होऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रतिष्ठेची तर माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
नुकतेच अक्कलकोट तालुक्यातील सहकार तत्वावर असलेल्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीचा निकाल माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाने 13 बिनविरोध तर उर्वरित 6 जागा सुध्दा एकतर्फी विजयी मिळवून भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
श्री स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे माजी सभापती संजीव पाटील, माजी उपसभापती अप्पासाहेब पाटील, माजी उपसभापती बसवराज माशाळे, माजी पं.स.सदस्य राजेंद्र बंदीछोडे आदी दिग्गज या पॅनलमधून लढत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
स्वामी समर्थ सह.साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याने काहीशी मरगळ झटकत ते पुन्हा अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीत श्री स्वामी समर्थ शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून माजी जि.प.सदस्य मल्लिकार्जुन पाटील, शिरवळचे माजी सरपंच बसवराज तानवडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बलभिम शिंदे यांचे सुपूत्र कपिल शिंदे, अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्ष डॉ.सुवर्णा मलगोंडा, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड आदी मातब्बर या पॅनलमधून लढत देत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
दुधनी बाजार समितीकरिता श्री सिध्दरामेश्वर शेतकरी पॅनलचे प्रमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, दुधनी भाजपा शहर अध्यक्ष अप्पू परमशेट्टी, दुधनी बाजार समितीचे उपसभापती सिध्दाराम बाके, भाजपा अल्पसंख्या जिल्हा उपाध्यक्ष वहिदपाशा शेख आदींनी निवडणूक लढवित आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे व माजी सभापती शंकर म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली श्री शांतलिंगेश्वर शेतकरी विकास पॅनलकडून माजी सभापती शंकर म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, माजी पं.स.सदस्य सतिश प्रचंडे, पं.स.चे माजी सभापती महेश जानकर आदीसह निवडणूक रिंगणात असल्याने यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असल्याची चर्चा तालुकावासियांतून होत आहे.
अक्कलकोट व दुधनी बाजार समितीची निवडणूकीचा निकाल हा दूरगामी परिणामकारक ठरणार असून निश्चितच याचे परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व तालुक्यातील तीनही नगरपालिकांवर होणार आहे.
अक्कलकोट बाजार समितीमध्ये आजतागायत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे वर्चस्व असून यंदाही सत्ता अबाधित राहणार असल्याचे पाटील यांच्या समर्थकांतून बोलले जात आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वत: दुधनी बाजार समितीच्या आखाड्यात उतरल्याने येथील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व शहरवासियांना बळ मिळाल्याने यंदा या बाजार समितीमध्ये चमत्कार होणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट बाजार समितीपेक्षा दुधनी बाजार समितीवर जास्त लक्ष केंद्रीत केल्याने सदरील निवडणूक ही आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रतिष्ठेची तर माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे