शैक्षणिक घडामोडी

सोलापूर विद्यापीठात ‘नॅचरल सेल्फी पॉइंट’चे उद्घाटन! कॅम्पसच्या सौंदर्यात भर पडली: कुलगुरू डॉ. फडणवीस

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सोलापूर विद्यापीठात ‘नॅचरल सेल्फी पॉइंट’चे उद्घाटन!
कॅम्पसच्या सौंदर्यात भर पडली: कुलगुरू डॉ. फडणवीस

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर, दि.4- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती जवळील लॉनमध्ये ‘नॅचरल सेल्फी पॉइंट’चे उद्घाटन गुरुवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सेल्फी पॉइंटमुळे विद्यापीठ कॅम्पसच्या सौंदर्यात आणखीन भर पडल्याची भावना कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी प्र-कलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियांत्रिकी विभागातील विनोद बंडगर आणि प्रशांत भोसले यांच्या पथकाकडून टाकाऊ वस्तुपासून तसेच काही शोभेची रोपे, फुलझाडे आणि लाकडापासून नॅचरल सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. येथील लाकडांवर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून वारली पेंटिंग करण्यात आल्याने सेल्फी पॉईंट आणखीनच सुंदर दिसत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सेल्फी पॉइंट तयार करणाऱ्या अभियांत्रिकी विभागातील माळी व कामगारांचा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसह विद्यापीठात येणाऱ्या सर्व संबंधितांना सेल्फी पॉईंट आनंद देऊन जाईल, असेही यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले. शेवटी कुलसचिव योगिनी घारे यांनी सर्वांचे आभार मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती जवळील लॉनमध्ये ‘नॅचरल सेल्फी पॉइंट’चे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, कलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button