तीर्थक्षेञ डोंबरजवळगे श्री महालक्ष्मी याञा 29,30 व 31 मे 2023 रोजी संपन्न होणार..
याञा महोत्सव 2023
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/05/FB_IMG_1683892024508-675x470.jpg)
तीर्थक्षेञ डोंबरजवळगे श्री महालक्ष्मी याञा 29,30 व 31 मे 2023 रोजी संपन्न होणार..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान तीर्थक्षेञ डोंबरजवळगे श्री महालक्ष्मी याञा दिंनाक 29-05-2023 रोजी नैवेद्द व 30-05-2023 व 31-05-2023 श्री महालक्ष्मी देवीची मिरवणुक असेल व 01-06-2023 कुस्ती असेल.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
*अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गाव आहे गाव तस लहानच आहे पण श्री महालक्ष्मी देवीच्या रुपाने डोंबरजवळगे नावाला वैभव प्राप्त झाले आहे*,
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
*दरदोन वर्षानी डोंबरजवळगे श्री महालक्ष्मीची याञा भरते एकदम छान उत्तम नियोजन पध्दतीने याञा पार पाडली जाते*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
*श्री महालक्ष्मी देवीस पुरणपोळीचा नैवेद्द दाखवला जातो,श्री महालक्ष्मी देवीची मिरवणुक ही संपुर्ण गावात दोन दिवस निघते व प्रत्येकाच्या घरी श्री महालक्ष्मीस नेण्यात येते व प्रत्येकजण देवीस साडी चोळी बांगड्या ओटी भरुन पाठवतात*,
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
*डोंबरजवळगे श्री महालक्ष्मी याञा शेकडो वर्षापासुन सुरु आहे या याञेस अक्कलकोट तालुका,दक्षिण सोलापुर,मुंबई,पुणे,सोलापुर,कर्नाटक,आंध्रप्रदेश,गुजरात येथील लाखो भाविक दर्शनासाठी येतात व नवस बोलतात नवसाला पावणारी अशी श्री महालक्ष्मी आहे*,
*याञा कालावधीत पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो,दोन दिवसीय याञेत मोठे पाळणे,छोटे पाळणे,मौत का कुआ व हाॅटेल व्यावसायिक,आईस्र्किम गाडी वाले,भेळ,कचोरी ,खेळणी,बांगड्या दुकानवाले आदीजण याञेत आर्वजुन असतात*,
*या याञेसाठी ढोल वादनासाठी जे दरवर्षी ढोल वाजवतात असे मानकरी बोरेगाव,खडकी धोञी येथील ढोलवादक आपली कला दोन दिवस साजरी करतात व तसेच देवीचे खांदेकरी देखील ते संपुर्ण दोन दिवस श्री महालक्ष्मीस खांद्यावर घेवुन संपुर्ण गाव फिरतात व देवीचे मानकरी,खांदेकरी,सेवेकरी हे याञा संपुर्ण होईपर्यंत श्री महालक्ष्मी च्या सेवेत असतात*,
*श्री महालक्ष्मी देवस्थान डोंबरजवळगे ही ट्रस्ट आहे या ट्रस्टी मध्ये चेअरमन आप्पासाहेब चिवरे आहेत,तर सचिव शिवनिंगप्पा पाटील आहेत व ट्रस्टी हिरामणी नारायणकर हे आहेत*,
*याञा फार मोठी असल्याने या ठिकाणी श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट डोंबरजवळगे यांच्यामार्फत एक याञाकालावधीसाठी पंच कमिटी नेमली जाते त्या पंच कमिटीमध्ये एक अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार व इतर पंच म्हणुन नेमले जातात ही पंच कमिटी देवस्थानच्या ट्रस्ट मार्गदर्शनाखाली याञा सुरळीत पार पाडते,*
*याञा पंच कमिटी साठी चंद्रकांत चटमुटगे यांची अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे तर उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे आनंद सत्यवान गायकवाड व शिवाजी नारायण गवळी यांची नियुक्ती केली आहे व खजिनदारपदी प्रकाश सोमवंशी व प्रकाश माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे*,
*19 मे बादमी अमावस्येनंतर डोंबरजवळगे याञेच्या धामिॅक विधींना सुरुवात होते दर दोन वर्षानी ही याञा भरते मागील याञा ही जुन 2019 ला संपन्न झाली तसेच जुन 2021 याञा कोरोनामुळे रद्द झाली आहे चार वर्षानंतर याञा भरणार आहे*
*या याञेसाठी ग्रामपंचायती मार्फत स्वच्छ पिण्याचे पाणी,स्वच्छता,दिवा बत्ती, व इतर अशी अनेक कामे चोख पार पाडली जातात,डोंबरजवळगेचे विद्दमान सरपंच चिदानंद माळगे व उपसरपंच शिवलाल नारायणकर सर यांनी सांगितले संपुर्ण गाव स्वच्छता व पाण्याची मुबलक सोय ग्रामपंचायती मार्फत करण्यात येईल असे कळविले आहे व गावात कायदा सुव्यव्सथा राहण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेणार असल्याचे पोलिसपाटील पुनमताई गायकवाड यांनी कळविले आहे*,
*याञा सुरळीत पार पडण्यासाठी गावातील अंबण्णा दुलंगे,अविनाश गायकवाड,दयानंद काशीनाथ पवार,रामचंद्र माळगे,हेमंत मधुकर पाटील,बाबु गवळी,प्राध्यापक विवेक नारायणकर सर,शिवबाळ सुलगडले,राजु अडवितोटे,पञकार शंकर माळी,पिंटु उदगिरे,हिमायत कादरी बाबा,संदिप गायकवाड,प्राध्यापक नितीन नारायणकर सर,गजानन जकिकोरे,बंटी नारायणकर आदी प्रमुख व्यक्तीवर याञा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे*,
*अंतर सोलापुर-30 Km*
*अक्कलकोट-20 Km*
*नळदुर्ग-25 Km*
*सर्व भक्तानी यथाशक्ती देणगी श्री महालक्ष्मी मंदिरास द्दावी ही विनंती*.