कवी नायगांवकरांचे काव्यसंग्रहांचा किर्तीमान जागतिक स्तरावर – महेश इंगळे
कवी नायगावकर यांचा वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांनी केला सन्मान

कवी नायगांवकरांचे काव्यसंग्रहांचा किर्तीमान जागतिक स्तरावर – महेश इंगळे

कवी नायगावकर यांचा वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांनी केला सन्मान

(Shrishail Gavandi)

जेष्ठ कवी अशोक नायगांवकर हे महाराष्ट्राच्या काव्य क्षेत्रातील दीपस्तंभ आहेत. इ.स. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर होते. या संमेलनात ते बोलताना म्हणाले होते की महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृद्ध व्हाल असा सल्ला ते नेहमी काव्यप्रेमी व वाचकांना देतात. इस्त्रायल, कतार, डेट्राईट, दुबई, न्यूकॅसल, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, बँकॉक, बफेलो, लंडन, लॉसएंजेलिस, शिकागो, सिंगापूर, इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. नायगावकर मंचावर उभे राहिले, की काहीतरी रंगतदार, मजेदार ऐकायला मिळणार या उत्सुकतेने श्रोतेवर्ग उत्सुक असतात, म्हणून कवी नायगांवकरांच्या काव्यसंग्रहांचा किर्तीमान जागतिक स्तरावर असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कवी अशोक नायगावकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. यावेळी बोलताना कवी नायगांवकर यांनी श्री स्वामी समर्थांची असीम कृपा व आशीर्वाद या काव्य मैफिलीला नेहमीच प्रेरणा देतात असे भावोद्गार काढले. यावेळी सिध्देश्वर बँक प्रशासन अधिकारी मिलिंद लिगाडे, समाजसेवक शिवपूत्र हळगोदे, शिवशरण अचलेर, देवस्थानचे सचिव ए.एम. घाटगे, दिपक वाघापारे, शाम चव्हाण, सोपान काळे आदींसह मंदिर समितीचे सेवेकरी कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ – कवी अशोक नायगांवकरांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
