अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे राज्यात धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट व्यवस्थापन असल्याचे मनोगत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सुविद्या पत्नी ; सौ.कांचन गडकरी
अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे राज्यात धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट व्यवस्थापन असल्याचे मनोगत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सुविद्या पत्नी सौ.कांचन गडकरी

अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे राज्यात धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट व्यवस्थापन असल्याचे मनोगत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सुविद्या पत्नी सौ.कांचन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

त्या तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आल्या असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी त्यांनी महाप्रसादलायची पाहणी करून समाधान व्यक्त केले व त्यांनी सेवा देखील रुजू केले. त्यांच्या समवेत मधुरा गडकरी , प्रदीप खुपसे, अनिल विपत, महेश हिंडोळे, उत्तम गायकवाड हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, आप्पा हंचाटे, प्रवीण देशमुख, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, कल्याण देशमुख, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, सौरभ मोरे, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, अतिष पवार, गोविंद शिंदे, मनसेचे नागु कुंभार, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, शरद भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
