जिल्हा घडामोडी

अक्कलकोट तालुक्यातील घटना भाविकाच्या गाडीला शिरवऴ वाडीजवळ भीषण अपघात ६ जण ठार; ७ जखमी

आषाढीवारी साेहळा संपवुन घराकडे जाताना काळाचा घाला....!

सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील घटना भाविकाच्या गाडीला शिरवऴ वाडीजवळ भीषण अपघात ६ जण ठार; ७ जखमी

HTML img Tag Simply Easy Learning    

आषाढीवारी साेहळा संपवुन घराकडे जाताना काळाचा घाला….!

HTML img Tag Simply Easy Learning    

साेलापूर : अक्‍कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ सिमेंट बल्गर-क्रूझर जीपचा अपघात झाला असून या अपघातात क्रूझरमधील 6 जण जागीच ठार झाले असून 7 ते 10 जण जखमी झाले आहेत.
हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. मृत व जखमींना अक्‍कलकोट येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. क्रूझर जीपमधील सर्वजण हे पंढरपूर येथे आषाढी वारीचा सोहळा संपवून शुक्रवारी दुपारी गावाकडे निघाले होते अशी सूत्रांची माहिती आहे. मयतांमध्ये पाच महिला व एका मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

एमएच 12 यूएम 7186 क्रमांकाचा सिमेंटचा बल्गर गुलबर्गा येथून वागदरीमार्गे अक्‍कलकोटकडे येत होता. तर क्रूझर जीप नं. केए 35 ए 7495 ही अक्‍कलकोटकडून गुलबर्गाकडे जात होती. क्रूझरमधील सर्वजण हे देवदर्शन करून कर्नाटकातील अणूर या गावाकडे जात असताना शिरवळवाडी गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात क्रूझर जीपमधील प्रवासी हे मयत व जखमी झाले असून अपघाताची माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह शिरवळवाडी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. या अपघातातील मयत व जखमींना उपचारासाठी तात्काळ अक्‍कलकोट येथील प्राथमिक उपचार केंद्राकडे हलविले आहे. अपघातातील मयत व जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group