श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय, अक्कलकोट या संगीत विद्यालाचे केंद्र संचालक पदि मयूर स्वामी यांची निवड
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230727-WA00411-634x470.jpg)
अक्कलकोट : दि,२७ – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई सलग्नित श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय, अक्कलकोट या संगीत विद्यालाचे केंद्र संचालक पदि मयूर स्वामी यांची निवड करण्यात आली. सदर निवड अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय, अक्कलकोट हि अक्कलकोट येथील सर्वात जुनी व एकमेव संगीत केंद्र आहे. या विद्यालयातून अनेक विध्यार्थी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. शास्त्रीय संगीताचे थोर उपासक संगीतालंकार कै.शरणप्पा कलबुर्गी हे या विद्यालयाचे संस्थापक व केंद्र संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात हे पद मयूर स्वामी यांच्या कढे सोपवण्यात आली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
या बद्दल शंकर लंगोटे, श्रीमती कुंदा नखाते, प्रभूलिंग कलबुर्गी, अशोक कडगंची, मल्लिनाथ स्वामी, वीरंणा कलबुर्गी, मनीषा करंदीकर, संतोष वगाले, चंद्रकांत डांगे, नागनाथ चव्हाण, अक्षय सरदेशमुख, ओंकार पाठक, आदित्य जोशी आणि महेश स्वामी आदींनी अभिनंदन केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)